Nagpur Heatwave : नागपुरात उन्हाचा तडाखा, तीन वर्षांतील सर्वात उष्ण दिवस
Rising Temperatures in Nagpur: नागपुरात गुरुवारी ४१.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले, जे तीन वर्षांतील मार्चमधील सर्वाधिक आहे. विदर्भातील ब्रह्मपुरी राज्यातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले.
नागपूर : ढगाळ वातावरणामुळे गेल्या आठवड्यात घसरलेला तापमानाचा पारा पुन्हा अपेक्षेप्रमाणे चढू लागला आहे. गुरुवारी विदर्भात तापमानाचा भडका उडून कमाल तापमान एक ते दोन अंशांनीवर सरकले.