HSC Exam 2023 : कसे होणार ‘रनर’चे ट्रॅकिंग?

अडचणींची शर्यत : बोर्डाकडे यंत्रणाच नाही
hsc board exam 2023 paper taken from custodian runner will videographed and GPS tracked
hsc board exam 2023 paper taken from custodian runner will videographed and GPS trackedesakal

नागपूर : राज्यात बारावीच्या परीक्षांना मंगळवारपासून सुरुवात होत आहे. यंदाही केंद्रापर्यंत पेपर पोहोचविण्यासाठी ‘रनर’चा उपयोग करण्यात येणार आहे. पेपर केंद्रावर पोहोचविणे आणि आणने यासाठी कस्टोडियनकडून पेपर घेताच ‘रनर’ला व्हीडिओग्राफी, जीपीएस ट्रॅकिंग करायचे आहे. मात्र, पेपर पोहोचविताना येणाऱ्या समस्यांमुळे या ‘ट्रॅकिंग’वरच प्रश्‍नचिन्ह निर्माण होताना दिसून येते.

बोर्डाने यावर्षी ‘रनर’साठी नियमावली तयार केली. त्यातून कस्टोडियनकडून पेपर घेतल्यावर ‘रनर’ला व्हीडिओग्राफी, जीपीएस ट्रॅकिंग करायचे आहे. मात्र, कस्टोडियन ते केंद्र यादरम्यान ‘रनर’ला मार्गात काही अडचण आली, वा त्याने मार्ग बदलला किंवा एखाद्या ठिकाणी काही वेळ थांबल्यास यानुसार ‘रनर’वर काही कारवाई होणार काय?

याचा खुलासा केलेला नाही. विशेष म्हणजे, कस्टोडियनलाच त्याचे जीपीएस ट्रॅकिंग करायचे असल्याने त्याबाबत बोर्डाकडून कुठलीही यंत्रणा दिलेली नाही. त्यामुळे एकावेळी दहा ते बारा जणांचे ट्रॅकिंग कसे करणार? हा मोठा प्रश्‍न आहे. त्यामुळे या यंत्रणेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण होताना दिसून येते.

गठ्ठा सांभाळणारा कसा करेल व्हिडिओग्राफी

‘रनर’सोबत पेपरचा गठ्ठा घेऊन जाण्यासाठी एका व्यक्तीची निवड करण्यात आली आहे. गाडी चालवीत असताना, या व्यक्तीला गठ्ठा सांभाळून आपल्या मोबाईलमधून व्हिडिओग्राफी करायची आहे.

कसे होणार ‘रनर’चे ट्रॅकिंग?

मात्र, तो गठ्ठे सांभाळून ती कशी करणार, हाही प्रश्नच आहे. त्यामुळे नेमके ते होईल का? हे सांगता येत नाही.

अपघाताची शक्यता

गेल्यावर्षीपासून बोर्डाने ‘रनर’ संकल्पना राबविण्यास सुरुवात केली. हे काम करताना काही शिक्षकांना आपला जीवही गमवावा लागला होता. त्यात वाडीतील एका शिक्षकाचा समावेश होता. त्यामुळे जीपीएस ट्रॅकिंग, व्हिडिओग्राफीमुळे शिक्षकांच्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

...तर जबाबदार कोण?

शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. यात मोक्षधाम घाट ते बसस्थानक, अमरावती मार्ग, हुडकेश्‍वर, बर्डी याशिवाय विविध ठिकाणी महानगरपालिकांची कामे सुरू आहेत. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होताना दिसून येते. या ठिकाणी ‘रनर’ फसल्यास आणि त्याला वेळ लागल्यास कोण जबाबदार ठरणार? हा मोठा प्रश्‍न आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com