esakal | बापरे! उपराजधानीतील रामदासपेठेत कोरोनाचे संशयित बॉम्ब? पॅथॉलॉजी सेंटरमध्ये गर्दीच गर्दी!

बोलून बातमी शोधा

huge crowd gathering at ramdaspeth Nagpur for corona testing

शहरात रामदासपेठेतील सेन्ट्रल बाजार रोडवरील खासगी प्रयोगशाळेसमोर मोठ्या प्रमाणात कोरोना चाचण्यांचे निदान केले जाते. परंतु धक्कादायक बाब म्हणजे कोरोनाचे निदान करणाऱ्या खासगी प्रयोगशाळेसमोर संशयित कोरोनाबाधितांची गर्दी होते.

बापरे! उपराजधानीतील रामदासपेठेत कोरोनाचे संशयित बॉम्ब? पॅथॉलॉजी सेंटरमध्ये गर्दीच गर्दी!

sakal_logo
By
केवल जीवनतारे

नागपूर ः उपराजधानीत असलेल्या आरोग्यसेवेचा लाभ घेण्यासाठी पूर्ण विदर्भाबरोबरच मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमधील रग्ण उपचारासाठी येतात. या रुग्णांसाठी मेयो-मेडिकल हाच पर्याय आहे. मात्र उपराजधानीतील मध्यमवर्गीय खासगी प्रयोगशाळांमध्ये (प्रायव्हेंट पॅथॉलॉजी) कोरोना चाचणी तपासणीला प्राधान्य देतात. 

ही तर अक्षरशः लूटमार! खासगी सिटी स्कॅन केंद्रांवर रुग्णांची लूट; मेडिकलमध्ये मात्र मोफत

शहरात रामदासपेठेतील सेन्ट्रल बाजार रोडवरील खासगी प्रयोगशाळेसमोर मोठ्या प्रमाणात कोरोना चाचण्यांचे निदान केले जाते. परंतु धक्कादायक बाब म्हणजे कोरोनाचे निदान करणाऱ्या खासगी प्रयोगशाळेसमोर संशयित कोरोनाबाधितांची गर्दी होते. ही गर्दी म्हणजे संशयित कोरोना बॉम्ब तर ठरणार नाहीत ना, अशी भीती निर्माण होत आहे. याकडे प्रशासन डोळेझाक करीत आहे.

भारतीय वैद्यकीय अनुसंधान चिकित्सा परिषदेच्या दिशादर्शक सूचनांमुळे खासगीतील प्रयोगशाळांनाही कोरोना निदानाची परवानगी दिली. परंतु निकषांना मात्र हरताळ फासला जातो. मिडास हाईटच्या दोन्ही बाजूला दोन खासगी प्रयोगशाळा आहेत. सर्वाधिक गर्दी रामदासपेठेतील सोमलवार शाळेच्या समोरील बाजूला असलेल्या खासगी प्रयोगशाळेसमोर असते. या प्रयोगशाळेत कोरोना निदानासाठी येणाऱ्या संशयितांची गर्दी पाच पटीने वाढली आहे. येथे अनेक रुग्णालयांसह इतर खासगी कार्यालयांची पार्किंगची सोय आहे, परंतु येथे ठेवलेल्या वाहनांवर कोरोना संशयित थेट बसतात. यामुळे दुचाकी वाहनेही कोरोना प्रसारासाठी धोकादायक ठरतात.

Success Story: हिरव्यागार शेतात वन्य प्राण्यांचा...

येथेच घुटमळतात सारे

जितक्या वेळेत ते इमारतीच्या परिसरात संशयित कोरोनाबाधित घुटमळतात. नमुने दिल्यानंतर लगेच संशयित घरी निघून जात नाही. तर याच परिसरात मोठ्या प्रमाणात खासगी रुग्णालये आणि औषधालये आहेत. नारळ पाणी विकणारे फेरिवाले असतात, त्यांच्याकडे नारळ पाणीही हे संशयित पितात. रस्त्यावरून जाणाऱ्या वाहकामार्फत परिसरात पसरलेल्या विषाणूच्या संपर्कात आल्यास बाधित होण्याची शक्यता आहे. महापालिका, जिल्हा प्रशासनाकडून या खासगी प्रयोगशाळेला यापूर्वी समज दिली होता, दंड आकारला होता, परंतु पुढे हीच स्थिती कायम आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ