esakal | पतीला होता पत्नीच्या चारित्र्यावर संशय; मध्ये पडलेल्या मुलावरच केला फावड्याने हल्ला

बोलून बातमी शोधा

Husband doubts wifes character; The boy who fell in was attacked with a shovel

लक्ष्मण हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्याच वादातून शशिपालचा वडिलांसोबत मध्ये मंगळवारी रात्री वाद झाला. त्यानंतर शशिपाल झोपला. तो झोपेत असतानाच लक्ष्मण यांनी फावड्याने शशिपाल याच्या डोक्यावर वार केले.

पतीला होता पत्नीच्या चारित्र्यावर संशय; मध्ये पडलेल्या मुलावरच केला फावड्याने हल्ला
sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : पत्नीच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेत मारहाण करणाऱ्या पतीने वाद सोडविण्यास मध्ये पडलेल्या मुलावर फावड्याने हल्ला केला. ही खळबळजनक घटना यशोधरानगरमधील इंदिरा मातानगर येथे बुधवारी पहाटे घडली. शशिपाल लक्ष्मण कामखे (वय ३७) असे जखमीचे तर लक्ष्मण कामखे (व ६५) असे आरोपी वडिलाचे नाव आहे.

लक्ष्मण हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्याच वादातून शशिपालचा वडिलांसोबत मध्ये मंगळवारी रात्री वाद झाला. त्यानंतर शशिपाल झोपला. तो झोपेत असतानाच लक्ष्मण यांनी फावड्याने शशिपाल याच्या डोक्यावर वार केले. शशिपाल जखमी झाला. नातेवाइकांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. शशीपाल याच्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलिसांनी लक्ष्मण यांच्याविरुद्ध गंभीर दुखापतीचा गुन्हा दाखल केला आहे.

अधिक माहितीसाठी - हिट एक्झॉशन, हिट स्ट्रोक स्वतःला कसे वाचवाल? जाणून घ्या उष्माघाताची कारणे, लक्षणे आणि उपचार

वाहतूकदाराची चार लाखांनी फसवणूक

सायबर गुन्हेगाराने वाहतूकदाराची चार लाख २१ हजार रुपयांनी फसवणूक केली. ही घटना कपिलनगर भागात उघडकीस आली. मलकितसिंग बल (वय ६५, रा. बाबाबुद्धाजीनगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून कपिलनगर पोलिसांनी सायबर गुन्हेगाराविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. बल हे वाहतूकदार आहेत. त्यांच्या व्यवहाराची रक्कम बँकेत जमा असते. १ ते ९ मार्चदरम्यान सायबर गुन्हेगाराने त्यांच्या खात्यातील रक्कम स्वत:च्या खात्यात वळती केली. बल यांना कळताच त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. तपासानंतर पोलिसांनी सायबर गुन्हेगाराविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. 

कौटुंबिक कलहातून आत्महत्या

कौटुंबिक कलहातून ई-रिक्षाचालकाने आत्महत्या केली. ही घटना लष्करीबाग परिसरात बुधवारी सकाळी उघडकीस आली. वीरेंद्र विश्वनाथ डोंगरे (वय ४८) असे मृताचे नाव आहे. मंगळवारी वीरेंद्र यांचा पतीसोबत वाद झाला. मध्यरात्री वीरेंद्र यांनी लोखंडी हूकला दोरी बांधून गळफास घेतला. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. पाचपावली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

महत्त्वाची बातमी - चोर पावलांनी कमी होतो शरीरातील ऑक्सिजन; पन्नाशी ओलांडलेल्या ७० टक्के कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची गरज

कुख्यात कल्लू जेलमध्ये स्थानबद्ध

पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी अजनीतील कुख्यात गुंड सूरज ऊर्फ कल्लू ओमप्रकाश यादव (वय २४, रा. जोशीवाडी) याच्याविरुद्ध एमपीडीएअंतर्गत कारवाई करून त्याला कारागृहात स्थानबद्ध केले. कल्लू याच्याविरुद्ध शस्त्र बाळगणे, खंडणी, दरोडा, हत्येचा प्रयत्न, ठार मारण्याची धमकी देणे, जाळपोळ करणे आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. 

मुलीचे प्रियकरासोबत पलायन

कळमना भागात राहणाऱ्या १७ वर्षीय मुलीने प्रियकरासोबत पोबारा केला. सोमवारी सायंकाळी ती घरून निघाली. घरी परतली नाही. नातेवाइकांनी शोध घेतला असता आढळून आली नाही. या प्रकरणी कळमना पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून मुलीचा शोध सुरू केला आहे.