पैशाच्या वसुलीवरुन तृतीयपंथीयांचा राडा; पोलिस ठाण्यासमोर धिंगाणा

छायाचित्र काढण्यासाठी गेलेल्या छायाचित्रकारालाही तृतीयपंथीयांनी घेराव घातला.
crime
crimesakal

नागपूर : दुसऱ्याच्या हद्दीत पैशाची वसुली करण्यावरुन झालेल्या वादातून आज दुपारच्या सुमारास तृतीयपंथीयांच्या दोन गटांमध्ये राडा झाला. हे प्रकरण लकडगंज पोलिस ठाण्यात गेल्याने तिथेही तृतीतयपंथीयांनी चांगलाच धिंगाणा घातला. यावेळी त्याचे छायाचित्र काढण्यासाठी गेलेल्या छायाचित्रकारालाही तृतीयपंथीयांनी घेराव घातला. दरम्यान यावरुन काही जणांवर पोलिसांनी गुन्हा(crime) दाखल केला आहे.

crime
मॉर्निंग वॉक बेतला जिवावर; अहमदनगरमध्ये महिलेचा मृत्यू

आज शुक्रवारी सकाळच्या सुमारास मोतीबाग आणि हंसापूरीतील तृतियपंथीयांच्या गटात वसूलीवरून राडा झाला. मोतीबागेतील तृतियपंथी धावत्या रेल्वेत वसूली करतात. मात्र, आरपीएफने त्यांची नाकाबंदी केल्यामुळे ते हंसापूरी गटातील तृतियपंथीयांच्या परिसरात वसूलीसाठी निघाले. ही बाब हंसापूरी गटातील तृतियपंथीयांच्या लक्षात आली. यामुळे काही तृतियपंथीयांनी लगबगीने घटनास्थळ गाठले.

crime
इव्हिनिंग वॉक बेतला जीवावर! विचित्र अपघातात माजी मुख्यध्यापकांचा मृत्यू; CCTV मध्ये थरार कैद

आधी यादवनगर नंतर मारवाडी चौकात त्यांचा पाठलाग केला. मात्र, संख्येत कमी असलेल्या गटाने पळ काढला. मागे असणाऱ्यांनी पाठलाग करीत काहींना पकडले. त्यांच्यात हाणामारीही झाली. कशीबशी सुटका करून घेत जवळचे लकडगंज ठाणे गाठून आश्रय घेतला. पोलिसांनी मध्यस्थी केल्याने प्रकरण काहीसे निवळले. पण, घटनेची माहिती पसरत गेली तसे दोन्ही गटातील सदस्य लावाजम्यासह ठाण्यात पोहोचले. ही भानगड सुरू असताना बघ्यांचीही मोठी गर्दी झाली. दरम्यान, तणाव वाढत असतानाच पोलिसांनी जखमींची विचारपूस केली. वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना रुग्णालयातही घेऊन गेले.

घटनेची माहिती मिळताच सहपोलिस आयुक्त अश्वती दोरजे, पोलिस उपायुक्त गजानन राजमाने यांनी लकडगंज पोलिस ठाणे गाठून प्रकरणाची माहिती घेतली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक पराग पोटे यांनी वरिष्ठांच्या आदेशावरून कारवाई केली. दरम्यान त्याचे छायाचित्र काढण्यासाठी एका वर्तमानपत्राचे छायाचित्रकार गेले असता, त्यांना धमकाविण्यात आले. याशिवाय त्यांना धक्काबुक्कीही करण्यात आली. याबाबत दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी तृतीयपंथीयांवर गुन्हा दाखल केले आहे.

crime
होळीच्या दिवशी रंग खेळण्याचा आनंद बेतला जिवावर; दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू  

टोळीयुद्धाचे संकेत

अलीकडच्या काळात गल्लीबोळात तृतीयपंथीयांचे वसूलीसाठी फिरणे चांगलेच वाढले आहे. अधिक मिळकतीसाठी इतरांच्या परिसरात शिरकाव करणेही सुरू केले आहे. अगदी गल्लीबोळीत लग्न (marriage)असले तरी तृतीयपंथीय टोळीने पोहोचतात. ही बाब टोळीयुद्धाचे संकेत देणारी आहे. शुक्रवारच्या प्रकरणाची व्याप्ती मोठी असली तरी गटांमधील राडा नित्याची बाब असल्याचे सांगितले जाते. यातूनच टोळीयुद्धाचे संकेत मिळत आहेत. तृतीयपंथीयांमध्ये वासूलीचा वाद हेच मोठ्या वादंगाचे कारण आहे. तृतीयपंथी चमचम गजभियेचा वसुलीच्या असमान वाटपातून उद्भवलेल्या वादातूनच खून झाला होता. टोळीच्या म्होरक्यावरच खूनाचा(murder) आरोप आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com