

Income Tax Department
नागपूर: केंद्र शासनाच्या आयकर विभागात कंत्राटीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तीन महिने कार्यालयात कामावर दिले जाते आणि तीन महिने नोकरीत खंड दिला जातो. देशात कोणत्याही कंत्राटी नोकरीच्या धोरणात असा नियम नाही, असा अफलातून कंत्राटी नोकरीचे धोरण या विभागात असल्यामुळे कर्तव्यावर असलेले कर्मचारी मागील २० ते २५ वर्षांपासून कायम होण्याच्या आश्वासनाचा श्वास घेऊन जगत आहेत. किमान तीन महिन्यांचा खंड न देता वर्षभर हाताला काम द्यावे, अशी व्यथा कर्मचाऱ्यांनी मांडली.