esakal | पाश्चिमात्य व्यक्तींपेक्षा भारतीयांचे ‘ह्दय’ लहान
sakal

बोलून बातमी शोधा

Indians have a smaller 'heart' than Westerners

हा केंद्रांमध्ये २०१६ ते २०१९ दरम्यान उपचाराला येणाऱ्या १ हजार सामान्य संवर्गातील रुग्णांच्या हृदयाची तपासणी करण्यात आली. त्यात सर्वाधिक ४०० रुग्ण नागपुरातील होते. या संशोधनामुळे लहान हृदयाबाबत आणखी अभ्यास करून नव्या उपाययोजना शोधून काढण्यास उपयोग होईल, असे डॉ. शंतनू सेनगुप्ता म्हणाले

पाश्चिमात्य व्यक्तींपेक्षा भारतीयांचे ‘ह्दय’ लहान

sakal_logo
By
केवल जीवनतारे


नागपूर : सोप्या शब्दांत सांगायचे झाले तर हृदय हे शरीराचा मोटर पंप असते. हृदय कार्यप्रवण असेपर्यंत आवश्यक तेवढे रक्त पंप करते, परंतु ह्दयाची कार्यक्षमता कमी झाली की, हृदयातील स्नायू शरीराच्या गरजेनुसार आवश्यक तेवढे रक्त पंप करू शकत नाहीत.मात्र अलिकडे ‘हृदया’वर एक संशोधन झालं आहे. त्यात भारतातातील व्यक्तींचे हृदय पाश्चिमात्य देशातील नागरिकांपेक्षा १५ ते २० टक्क्यांनी लहान असते. असा निष्कर्ष पुढे आला आहे. हा अभ्यास अमेरिकेतील ‘द इंटरनॅशनल जनरल ऑफ कार्डिओव्हॅस्कुलर इमेजिंग’मध्ये प्रकाशित झाल्यानंतर ही माहिती पुढे आली आहे. विशेष असे की,  हृदयरोगतज्ज्ञ डॉ. शंतनू सेनगुप्ता यांच्या नेतृत्वात मागील चार वर्षांपासून देशातील सहा विविध ठिकाणी भारतातील सुमारे १ हजार व्यक्तींच्या हृदयावर सूक्ष्म अभ्यास करण्यात आला. यातून हे संशोधन पुढे आलं आहे.

त्यांच्या बोनस आयुष्याला कशाची आहे प्रतीक्षा...वाचा - 

 नागपुरातील सेनगुप्ता हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटय़ूट, ठाणे येथील ज्युपीटर हॉस्पिटल, गुरुग्राम येथील वेदांता, दिल्ली येथील फोर्टिस हॉस्पिटल, कोलकाता येथील रवींद्रनाथ टागोर हॉस्पिटल, इंदोर येथील सीएचएल हॉस्पिटल या अभ्यासात सहभागी होते. या सहा केंद्रांमध्ये २०१६ ते २०१९ दरम्यान उपचाराला येणाऱ्या १ हजार सामान्य संवर्गातील रुग्णांच्या हृदयाची तपासणी करण्यात आली. त्यात सर्वाधिक ४०० रुग्ण नागपुरातील होते. या संशोधनामुळे लहान हृदयाबाबत आणखी अभ्यास करून नव्या उपाययोजना शोधून काढण्यास उपयोग होईल, असे डॉ. शंतनू सेनगुप्ता म्हणाले. या संशोधनात ठाण्याहून डॉ. नितीन बुरकुळे, गुरुग्रामहून डॉ. मनीष बंसल, नवीन दिल्लीहून डॉ. जे. सी. मोहन, इंदोरहून डॉ. अतुल करांडे, कोलकाताहून डॉ. देबिका चॅटर्जी सहभागी झाल्या होत्या. 

संशोधनातून पुढे आलेला निष्कर्ष.. 

या तपासणीच्या अहवालात संबंधितांच्या हृदयाची उंची, रुंदी, आकारासह वजनाचा अभ्यास करण्यात आला. त्यात भारतीयांचे हृदय आकार आणि वजनाने १५ ते २० टक्क्यांनी कमी असल्याचे आढळले. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, सध्या पाश्चिमात्य देशातील पुरुषाचे हृदय ३०० ते ३५० ग्रॅम, महिलांचे २५० ते २८० ग्रॅम आहे. भारतातील पुरुषाचे हृदय ३०० तर महिलांचे हृदय २५० ग्रॅम इतके आहे. 

पाश्चिमात्य देशांमध्ये अर्थात विकसित देशांत मानवी अवयवांवर असे संशोधनात्मक अभ्यास करण्यात येतात. विकसनशील देशांमध्ये असे अपवादानेच होते. हृदयासह इतरही अवयवांवर या पद्धतीचा अभ्यास होणे आवश्यक हे. प्रथमच असा अभ्यास करण्यातताला. यात भारतीयांचे हृदय पाश्चिमात्य देशातील व्यक्तींच्या तुलनेत आकाराने लहान असल्याची माहिती पुढे आली. संशोधनामुळे देशात हृदयाच्या चाचणीसह इतरही निकषात गरजेनुसार बदल करता येतील. 

-डॉ. शंतनू सेनगुप्ता, सेनगुप्ता हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटय़ूट, नागपूर

loading image
go to top