Nagpur : ‘त्या’ अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 light

‘त्या’ अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सरळगाव : ऐन दिवाळीच्या काळात कल्याण - अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गावरील मुरबाड-सरळगाव या मार्गे अवाढव्य लोडिंग असलेल्या वाहनांची वाहतूक सुरळीत व्हावी, म्हणून मुरबाड विद्युत मंडळाने पहाटे ६ ते ८.३० या वेळेत तालुक्याचा सरळगाव विभाग विद्युतपुरवठा खंडित केला होता. याविषयी ‘सकाळ’ने ८ नोव्हेंबरला ‘मुरबाडकराची भाऊबीज अंधारात’ मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी घेतली. खासगी गाड्यांच्या वाहतुकीसाठी लोकांना विद्युत मंडळाने वेठीस धरू नये, अशी सूचना पाटील यांनी संबंधित खात्याला केली आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईचीही सूचना केली आहे. खुद्द केंद्रीय मंत्र्यांनी दखल घेतल्याने संबंधित अधिकाऱ्यांचे दाबे दाणाणले आहे.

महामार्गावरून विद्युत तारा जात आहेत; मात्र या तारा जीर्ण झाल्या आहेत. त्या महामार्गावर लोंबकळत असल्याने अवजड वाहतूक येथून होत असताना काही चालक परस्पर या तारा बांबूच्या साह्याने वर करतात. त्यामुळे येथे अपघात होण्याची शक्यता आहे; तर काही ठेकेदार परस्पर विद्युत मंडळाच्या कर्मचाऱ्यांशी बोलून विद्युतपुरवठा खंडित करतात. त्याचा नाहक फटका नागरिकांना बसला. या विषयी ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील व स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी घेतली.

अवजड वाहनांची वाहतूक करणे गरजेची असल्यास ती दिवसा करावी. रात्री किंवा सकाळी विद्युतपुरवठा बंद करून नागरिकांना अंधारात ठेवू नये.

- कपिल पाटील, केंद्रीय राज्यमंत्री

हेही वाचा: गोपीचंद पडळकर,तानाजी पाटलांचा अर्ज फेटाळला ; आटपाडीत पोलिस तैनात

अवजड वाहनांची वाहतूक करताना नियोजन करणे गरजेचे आहे. सणांच्या दिवशी नागरिकांना अंधारात ठेवणे योग्य नाही. मी स्वतः कार्यकारी अभियंता रामटेके यांच्याशी बोललो आहे. यापुढे अशा प्रकारची वाहतूक करताना काळजी घेण्यास सांगितले आहे.

- किसन कथोरे, आमदार

विद्युत मंडळाबद्दल ग्राहकांच्या अनेक तक्रारी आहेत. ‘सकाळ’ने याविषयी वृत्त प्रसिद्ध करून मुरबाडकरांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली.

- अनिल घरत,

माजी पंचायत समिती सदस्य

loading image
go to top