अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी...काय घडले असे?

file
file

देवलापार (जि.नागपूर) :   एकाच गावात राहात असल्यामुळे नेहमी एकमेकांना भेटणे, तासन्‌तास एकमेकांशी बोलत बसणे, एकांतात रंगवलेली स्वने सांगणे, असा नित्यक्रम सुरू असतानाच एके दिवशी काय झाले कुणास ठावूक ! प्रियकराने नैराश्‍येतून भलतेच पाउल उचलले. प्रेयसी त्याच्या या निर्णयाने अतिशय दुःखी झाली आणि तिनेही तेच केले जे "त्याने' केले. भातुकलीच्या खेळाप्रमाणे त्यांचा डाव अर्ध्यावरच मोडला.

अधिक वाचा : नराधमाला बाप म्हणावे की आजोबा? सावत्र बापाने केलेल्या बलात्कारातून मुलीची प्रसुती

नातलग म्हणतात, कुठलीच कल्पना नव्हती !
9 जुलै रोजी प्रियकराने नैराश्‍येतून आत्महत्या केली. त्या दुःखाने प्रेयसीचे मन हेलावले. तिची प्रकृती खालावली. कुटुंबीयांनी तिच्यावर उपचार केले. हॉस्पिटलमधून सुटी झाल्यानंतर तिला घरी आणले. त्यातच तिने संधी साधून प्रियकराच्या आत्महत्येनंतर सात दिवसांनी घरी गळफास लावून घेतला. ही घटना देवलापार (ता. रामटेक) पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पिपरीया येथे 16 जुलै रात्री घडली. अतुल कोहळे (22) व निकीता गजभिये (21) अशी मृतांची नावे आहेत. दोघेही एकाच गावचे रहिवासी असल्याने त्यांची आपसांत ओळख होती. त्यांच्या याच ओळखीचे मैत्री आणि पुढे प्रेमात रूपांतर झाले. मात्र, त्यांच्या प्रेमप्रकरणाबाबत गावात कुणाला फारशी माहिती नव्हती, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.

अधिक वाचा :  पाऊस आला धावून, शेत गेले वाहून, मुसळधार पावसाने पिकांचे नुकसान   

आधीही तो "हेच' बोलत होता.
दरम्यान, अतुल 9 जुलै रोजी रात्री दहाच्या सुमारास घराबाहेर पडला. त्याचवेळी आत्महत्या करीत असल्याचे त्याने निकिताला फोनवर सांगितले. तो याआधी बरेचदा अशाप्रकारचे बोलल्याने तिने मनावर घेतले नाही. मात्र, त्याने त्या रात्री गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात गळफास लावून आत्महत्या केली. वनविभागात नोकरीला असलेल्या व्यक्तीला तो लटकलेल्या अवस्थेत दिसला आणि बातमी गावात पसरली. या घटनेमुळे निकिता अस्वस्थ झाली होती. शुक्रवारी (ता. 10) अतुलच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अधिक वाचा :आयुक्‍त मुंढेच्या नावाने बघा काय सुरू आहे नागपुरात?

तुझ्यामुळे पोलिस ठाण्यात जावे लागते !
मात्र, दुसरीकडे निकिताची प्रकृती खालावली. त्यामुळे कुटुंबीयांनी तिला लगेच रामटेक येथील खासगी रुग्णालयात भरती केले. मंगळवारी (ता. 14) सुटी झाल्याने तिला कुटुंबीयांनी घरी आणले. त्यातच दोन दिवसांच्या घडामोडीनंतर वडिलांनी तिच्याजवळ, तुझ्यामुळे पोलिस ठाण्यात जावे लागत आहे, असे म्हणत नाराजी व्यक्त केली होती. त्यातच तिने गुरुवारी (ता. 16) सायंकाळच्या सुमारास घरातील मंडळी बाहेर असल्याचे पाहून खोलीत दुपट्ट्याच्या मदतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. काही वेळाने हा प्रकार लक्षात आल्याने पोलिसांना सूचना देण्यात आली. या दोन्ही घटनांमध्ये देवलापार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, घटनांचा तपास पोलिस निरीक्षक प्रवीण बोरकुटे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मी घोडके करीत आहेत.

अतुलचा खून केल्याचा आरोप
अतुलची आत्महत्या नसून, त्याचा खून करण्यात आल्याचा आरोप त्याचा कुटुंबीयांनी केला आणि 13 जुलै रोजी पोलिसांत तक्रार नोंदवली. तक्रारीत गजभिये कुटुंबीयांचा उल्लेख असल्याने पोलिसांनी अतुल व निकिताच्या फोनची तपासणी केली. कॉल तपासले आणि फोनमध्ये असलेल्या फोटोवरून दोघेही एकमेकांच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट झाले. त्यातच पोलिसांनी निकिताला बुधवारी (ता. 15) पोलिस ठाण्यात बोलावून विचारपूस केली होती. ती वडिलांबरोबर गुरुवारी सायंकाळी देवलापारहून पिपरीयाला आली होती. त्यानंतर दोन तासांनी तिने हे दुर्दैवी पाऊल उचलले.
 
संपादन : विजयकुमार राऊत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com