२०० वर्षांपासून नागपुरात भारतीय वाद्यांची निर्मिती

jarel family
jarel familySYSTEM

नागपूर : टाळांविना वारकरी नाही, नवरसाविना अभिनय नाही, घुंगराविना नृत्य नाही अन्‌ वाद्याविना वादक परिपूर्ण नाही. शहरातील जरेल कुटुंबीय भारतीय वाद्य (indian instrument production in nagpur) तयार करीत वादकांना परिपूर्ण करण्यास हातभार लावत आहेत. गेल्या दोनशे वर्षांपासून त्यांचा हा पिढीजात व्यवसाय सुरू असून आज त्यांची तिसरी पिढी या व्यवसायामध्ये आहे. (international music day indian instrument production by jarel family from 200 years in nagpur)

jarel family
लॉकडाउनच्या काळातही शस्त्रक्रिया; एप्रिलपासून २८९ रुग्णांवर शस्त्रक्रिया

जागनाथ बुधवारी तबला मार्केटमध्ये आजोबा, स्वातंत्र सैनिक गोपीचंद जरेल यांनी हा व्यवसाय सुरू केला. तबल्याच्या निर्मितीने सुरू झालेला त्यांचा हा प्रवास पुढे डग्गा, पखवाज, मृदुंग, नाल, हार्मोनिअम, ढोलकी आदी भारतीय वाद्य निर्मिती आणि दुरुस्तीपर्यंत गेला. यामध्ये कुटुंबीय पारंगत झाले. गोपीचंद जरेल यांनी हा व्यवसाय मुलाला, सागर जरेल यांना सोपविला. तर, भारतीय वाद्यांशी पाश्‍चिमात्य वाद्य स्पर्धा करीत असताना तिसऱ्या पिढीने खुबीने आपल्या पिढीजात व्यवसायामध्ये बदल केले.

२००४ सालच्या दरम्यान त्यांनी या पारंपरिक वाद्यांसह ड्रम, गिटार, कीबोर्ड असे पाश्‍चिमात्य वाद्यसुद्धा शहरामध्ये उपलब्ध करून दिले. हजारो रुपयांसह आयात करावे लागणारे हे वाद्य शहरामध्ये अल्प किमतीत यामुळे उपलब्ध झालेत. तिसऱ्या पिढीत सागर जरेल यांचा मुलगा संकेत याने हा व्यवसाय आपल्या हाती घेतला आहे. लहान वाद्यांसह लहानाचा मोठा झालेला संकेत हा आज वादकसुद्धा आहे. विशेष म्हणजे, गोपीचंद जरेल यांचा हा वारसा त्यांच्या मुलीच्या मुलांनी देखील आत्मसात केला. सुधीर अमनेक, हरीप्रसाद अमनेक हे प्रसिद्ध वादक असून वाद्य निर्मितीच्या व्यवसायामध्ये देखील रस घेत आहेत.

भोसले राजघराण्याला वाद्यांचा पुरवठा

स्वातंत्र सैनिक गोपीचंद जरेल त्या काळी भोसले राजघराण्याला नगारे, तबला, ढोलकी आदी वाद्य तयार करून देत. पुढे मदनलाल भांगडे यांच्या हिंदुस्थानी लाल सेनेमध्ये सक्रिय सहभाग घेउन स्वातंत्र लढ्यात त्यांनी सहभाग घेतला. वादकांना घडविणारे असे अनेक कलावंत पडद्यामागे आहेत. शासनाने एखाद्या योजनेचा लाभ मिळवून दिल्यास विक्रेते आणि कारागिरांना हक्काचे छत मिळेल. काही वर्षांपूर्वी रस्ता रुंदीकरणाच्या कारणाने त्यांचे पिढीजात दुकान प्रशासनाने जमीन दोस्त केले. त्यामुळे, भाड्याच्या दुकानामध्ये व्यवसाय चालविण्याची वेळ आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com