खंडणीबाज सहारेचा तपास गुन्हे शाखेकडे; पत्रकारांच्या नावाने मागितली खंडणी

खंडणीबाज सहारेचा तपास गुन्हे शाखेकडे; पत्रकारांच्या नावाने मागितली खंडणी

नागपूर : नागपूरचे राजे भोसले (King Bhosle of Nagpur) यांच्या कुटुंबीयाला तीन लाखांची खंडणी (Three lakh ransom) मागणाऱ्या त्रिशरण सहारे प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे (Investigation of Trisharan Sahare case to Crime Branch) सोपवण्यात आला आहे. त्यामुळे सहारेच्या अडचणी आणखीच वाढणार आहे. (Investigation-of-Sahare-case-in-Nagpur-to-Crime-Branch)

कुख्यात गुंड रणजित सफेलकरसोबत राजघराण्यातील एका व्यक्तीचे फोटो तसेच काही आक्षेपार्ह छायाचित्रे पत्रकारांकडे आहेत. ते छापायचे नसल्यास तीन लाख रुपये लागतील असे सांगून सहारे याने भोसले कुटुंबीयांतील एका सदस्यास खंडणी मागितली होती. याप्रकरणी त्यास अटक करण्यात आली आहे. चार वर्षांपूर्वी उमरेडजवळील टेमसना गावाजवळील १५ एकर शेतीच्या व्यवहाराची काही रक्कम कुख्यात रणजित सफेलकर याच्या बँक खात्यातून राजे भोसले घराण्याशी संबंधित विश्वजितसिंग किरदत्त यांच्या बँक खात्यात वळती झाल्याचे गुन्हेशाखा पोलिसांनी केलेल्या तपासादरम्यान समोर आले.

खंडणीबाज सहारेचा तपास गुन्हे शाखेकडे; पत्रकारांच्या नावाने मागितली खंडणी
वाघाचा थरार! एकाला मानेला पकडून नेले ओढत, तर दुसऱ्याला झाडावरून खेचले खाली

गुन्हेशाखा पोलिसांनी किरदत्त यांची चौकशी केली. याची माहिती त्रिशरण सहारे यांना माहिती मिळाली. सहारे यांनी किरदत्त यांच्याशी संपर्क साधला. ‘कुख्यात गुंड रणजित सफेलकर याचे तुमच्यासोबतचे छायाचित्र पत्रकारांकडे आहेत. ते वर्तमानपत्रात प्रकाशित झाल्यास तुमची बदनामी होईल. छायाचित्र प्रकाशित न करण्यासाठी तीन लाख रुपये द्यावे लागतील, असे सहारे किरदत्त यांना म्हणाला.

किरदत्त यांनी एक लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर किरदत्त यांनी गुन्हे शाखेकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त सुनील फुलारी, उपायुक्त गजानन राजमाने यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विशाल काळे, सहाय्यक निरीक्षक ईश्वर जगदाळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मेयो हॉस्पिटल चौकात सापळा रचला. सहारे याला एक लाख रुपये घेताच पोलिसांनी त्यांना अटक केली. पोलिसांनी त्यांची ३ जूनपर्यंत पोलिस कोठडी घेतली.

(Investigation-of-Sahare-case-in-Nagpur-to-Crime-Branch)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com