esakal | नागपुरात तिसऱ्या लाटेला जल्लोषात निमंत्रण! प्रेमीयुगुलांची रंगते ‘बर्थडे पार्टी’
sakal

बोलून बातमी शोधा

नागपुरात तिसऱ्या लाटेला जल्लोषात निमंत्रण! प्रेमीयुगुलांची पार्टी

नागपुरात तिसऱ्या लाटेला जल्लोषात निमंत्रण! प्रेमीयुगुलांची पार्टी

sakal_logo
By
अजय धर्मपुरीवार

हिंगणा (जि. नागपूर) : गपूर शहरातील प्रेमीयुगुलांसाठी प्रसिद्ध असलेले ‘लव्हर्स पॉइंट’ म्हणून ओळखले जाणारे मोहगाव (झिल्पी) तलावावर कोरोनाच्या काळातही मोठ्या प्रमाणात गर्दी उसळत आहे. प्रेमीयुगुलांच्या बर्थडेच्या पार्ट्या मोठ्या प्रमाणात रंगत आहेत. पोलिस प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने अशा पर्यटनस्थळावर तिसऱ्या लाटेला जल्लोषात निमंत्रण मिळत असल्याचा प्रकार सुरू झाला आहे. (Invitation-for-the-third-wave-of-coronavirus-in-Nagpur-nad86)

‘वीक एण्ड’ म्हणजे शनिवार व रविवार सुट्टीचा दिवस. या दिवशी तलावावर अक्षरशः प्रेमीयुगुलांची झुंबड उडते. शेकडो दुचाकी वाहने तलावाच्या शेजारी लावून रांगेत उभे असतात. खाद्यपदार्थांचे स्टॉलही मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी लागतात. सकाळी नऊपासूनच प्रेमीयुगुलांचा मेळा या तलावाच्या शेजारी भरतो. हिंगणा शहरातील हॉटेलमधून युवक खाण्यापिण्याचे पदार्थ सोबत घेऊन जातात.

हेही वाचा: भाजपशी जवळीक असलेला ओबीसी चेहरा राष्ट्रवादीच्या गळाला

तलावावर पोहोचल्यानंतर मित्र-मैत्रिणींचे घोळके तलाव शेजारी फिरताना दिसून येतात. तलावाच्या पलीकडे पाळीवरून केल्यानंतर जंगलाचा भाग लागतो. या जंगलव्याप्त भागात काही प्रेमीयुगुल बराच वेळ ठाण मांडून बसतात. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असतानाही अशा गर्दीकडे पोलिस विभाग, आरोग्य विभाग, तालुका प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे.

मोहगाव (झिल्पी) तलावावर खाद्यपदार्थांचे स्टॉल मोठ्या प्रमाणात लागले असतात. या स्टॉलला कोण परवानगी देतो, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. शनिवार-रविवार वगळता इतर दिवस प्रेमीयुगुलांची गर्दी कमी असते. यांची गर्दी असतानाच पुन्हा पर्यटन स्थळावर फिरायला जाणाऱ्या कुटुंबांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. सोशल डिस्टंसिंग पालन अजिबात केल्या जात नाही. प्रेमीयुगुलांच्या चेहऱ्यावर मॉस्क सुद्धा नसतो. बिनधास्तपणे शेकडो तरुण-तरुणी या तलावावर विहार करताना दिसून येतात.

डीसीपी दखल घेणार का?

पोलिस प्रशासनाने शनिवारी व रविवारी या तलावावर पोलिस बंदोबस्त ठेवावा, अशी मागणी मोहगाव (झिल्पी) ग्रामस्थांनी केली आहे. मात्र, या मागणीकडे ठाणेदार सारीन दुर्गे यांनी दुर्लक्ष केले आहे. पोलीस बंदोबस्त नसल्यामुळेच प्रेमीयुगुलांचा या ठिकाणी धुमाकूळ सुरू आहे. पोलिसांनी किमान शनिवारी व रविवारी दोन दिवस बंदोबस्त तैनात ठेवणे गरजेचे आहे. पोलीस उपायुक्त नरुल हसंन यांनी मोहगाव झिल्पी या पर्यटन स्थळाला भेट देऊन येथील परिस्थितीची पाहणी करावी.आठवड्यातून दोन दिवस पोलिस बंदोबस्त तैनात करावा, अशी मागणी मोहगाव (झिल्पी) ग्रामस्थांनी पोलिस प्रशासनाकडे केली आहे.

हेही वाचा: लग्नघरातच संपूर्ण कुटुंबाचा अंत; हळदही न निघालेल्या दाम्पत्याचाही मृत्यू

तलाव ‘मौत का कुवा’

मोहगाव (झिल्पी) तलावावर पिकनिक मनविण्यासाठी आलेल्या अनेक लोकांनी आपला जीव गमावला आहे. आतापर्यंत जवळपास १०० पेक्षा जास्त लोकांचा या तलावात बुडून मृत्यू झाला आहे. काही महिन्यांपूर्वी नागपूर शहरातील टिपू सुलतान चौकातील एका कुटुंबाने या ठिकाणी वाढदिवस साजरा केला. यानंतर आंघोळ करण्याचा मोह न आवरल्याने तलावात उतरलेल्या वडील आणि मुलाचा तलावातील पाण्याच्या गाळात फसून मृत्यू झाला होता. आतापर्यंत जवळपास १०० पेक्षाही जास्त लोकांचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे.

(Invitation-for-the-third-wave-of-coronavirus-in-Nagpur-nad86)

loading image