Isro : इस्रोच्या नव्या अंतराळ धोरणासाठी हवी राजकीय इच्छाशक्ती - अध्यक्ष एस. सोमनाथ

१०८ नव्या इंडियन सायन्स काँग्रेसच्या दूसऱ्या दिवशी आयोजित सत्रानंतर एस. सोमनाथ पत्रकारांशी बोलत होते.
S Somanath
S SomanathSakal
Summary

१०८ नव्या इंडियन सायन्स काँग्रेसच्या दूसऱ्या दिवशी आयोजित सत्रानंतर एस. सोमनाथ पत्रकारांशी बोलत होते.

नागपूर - अंतराळ कार्यक्रम आणि योजनांमध्ये खासगी संस्थांचा सहभाग, त्यांच्या जबाबदारी निश्चित करणे, विविध योजना आणि कार्यक्रमांमधील भूमिका, तसेच देशाच्या विकासातून स्पेस तंत्रज्ञानाचा वापर यावर आधारित नवे अंतराळ धोरण तयारर झाल्याची माहिती इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. मात्र, याचवेळी धोरण तयार करुन सरकारकडे सुपूर्द करण्याची प्रक्रिया आम्ही पूर्ण केली आता फक्त त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती आवश्यक असल्याचे सूचक विधान त्यांनी केले.

१०८ नव्या इंडियन सायन्स काँग्रेसच्या दूसऱ्या दिवशी आयोजित सत्रानंतर पत्रकारांशी बोलत होते. एस. सोमनाथ म्हणाले, गेल्या ६० वर्षांमध्ये इस्रोने अंतराळात मोठी प्रगती केली आहे. आता त्यात खासगी संस्थांची भागीदारी आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.मात्र, हे करीत असताना, काही कायदे, काही जबाबदाऱ्या आणि निश्चित धोरण ठरवावे लागणार आहे. त्याचा मसुदा तयार करण्यात आला आहे. तो मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे. येत्या एक ते दोन दिवसात त्याला मान्यता मिळण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

गगणयान हे मानवरहित (अनमॅन्ड मिशन ) यान या वर्षीच्या शेवटी अंतराळात पाठविण्यावर भर आहे. साधारणत गगणयानसाठी दहा वर्षाचा कालावधी लागत असून भारताने ते चार वर्षांत पूर्ण करण्याचे लक्ष्य हातात घेतले आहे. त्यासाठी चार चाचण्या घेण्यात येणार असून त्यापैकी दोन चाचण्या सध्या हाती घेण्यात आलेल्या आहे. त्यातही एक मानवरहित तर एक अंतराळविरासह पूर्ण केली जाणार आहे. मात्र, म्हणजे मानवरहित यान असल्याने त्याबाबत सावधगिरीने पुढे जात आहे. त्यासाठी रशिया आणि अमेरिकेतील तंत्रज्ञानाचीही मदत घेण्यात येत असून वातावरण नियंत्रण आणि जीवनरक्षक व्यवस्थाही तपासण्यात येत आहे. त्यामुळे ते थोडे खर्चिक असल्याचे ते म्हणाले.

चांद्रयाण -३ तयार

मंगळयानाची घोषणा एका महिन्यात

चांद्रयाण -३ तयार असून यापू्र्वी २ प्रमाणे आमच्या अपेक्षा सारख्या आहेत. गेल्यावेळी ज्याप्रमाणे चुका झाल्यात. त्या टाळून स्पेस लॅन्डींग आणि रोटर बाहेर निघावे याकडे व विशेष भर देण्यात येणार आहे. त्यामुळे जुन-जुलैमध्ये ते सोडणार असल्याचे एस. सोमनाथ म्हणाले, मंगळयानाची घोषणा एका महिन्यात होणार आहे. मात्र, शुक्रयान-१ मिशन हा विषय सध्या संकल्पेपुरता असून त्याबाबत दोन समिती तयार करण्यात आलेल्या आहेत. त्या सरकारसमोर आपले तथ्थ मांडतील.

अंतराळातील कचऱ्याबाबत वेट अॅण्ड वाॅच

१९६० पर्यंत अंतराळात कुठलाही कचरा नव्हता. मात्र, त्यानंतर त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. आज अंतराळामध्ये असलेले ८० टक्के सॅटेलाईट हे कामाचे नसून त्याचा कचरा नष्ट होण्यासाठी अडीच ते तीन हजार वर्ष लागगतात. त्यामुळे अंतराळ तज्ज्ञांसाठी मोठी समस्या आहे. त्यामुळे सॅटेलाईट सोडताना वा अंतराळात फिरताना बरीच काळजी घ्यावी लागते. याची विल्हेवाट लावण्याबाबत अद्याप कुठलीही पर्याप्त यंत्रणा अस्तित्वात नसल्याने ती देशांसाठी डोकदुखी ठरत आहे. हा सॅटेलाईट कचरा सात किलोमीटर वेगाने येत असल्याने त्यातून घटना होण्याची शक्यता आहे. मात्र, आता खासगी संस्था त्यात सहभागगी होण्यास इच्छुक असून त्यातील काही सॅटेलाईट अंतराळाबाहेर काही नष्ट करण्याचे काम हाती घेईल असेही ते म्हणाले.

दुसऱ्या प्रक्षेपण स्थानकासाठी जमिन अधिग्रहन लवकरच

तामिळनाडू येथे सुरू करण्यात येणाऱ्या दुसऱ्या प्रक्षेपण स्थानकासाठी जमिन अधीग्रहणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून उभारणीसाठीचा संपूर्ण आराखडा तयार असल्याचीही माहिती एस.सोमनाथ यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com