Nagpur News: धरणगाव येथील देशविरोधी घोषणांचा विषय विधान परिषदेत; गृहमंत्र्यांनी दिले पोलीस प्रशासनास कारवाईचे आदेश

Photo of the march on November 8, 23 in Dharangaon city.
Photo of the march on November 8, 23 in Dharangaon city.esakal

नागपूर : धरणगाव शहरात गेल्या महिन्यात निघालेल्या मुस्लीम समाजाच्या रॅलीमध्ये जैन गल्ली व बाजार पेठ दरम्यान काही समाजकंटकांनी पॅलेस्टीन आणि हमास या दहशतवादी संघटनेच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या.

तसेच पॅलेस्टीन व हमासचे झेंडे देखील फडकाविले होते. त्यावेळी भारत विरोधी घोषणा देखील देण्यात आल्या होत्या.

या प्रकरणी चौकशी करुन कारवाई करण्याच्या सूचना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत. विधान परिषदेत या संदर्भातील प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.  (issue of anti national slogans in Dharangaon in Legislative Council Home Minister fadanvis gave action orders to police administration Nagpur News)

विशेष म्हणजे या रॅलीचे आयोजन पोलीस प्रशासनाच्या परवानगीने करण्यात आले होते. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त देखील होता, पोलीस निरीक्षकांसह फौजफाटा तैनात होता. 

हा सर्व प्रकार व घटनाक्रम बंदोबस्तात असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांसमक्ष घडलेला असताना पोलिसांनी या प्रकरणी अंग काढून घेतले. ही बाब लाजिरवाणी, निंदनीय तसेच धोकेदायक बाब असल्याने या प्रकरणी चर्चा घडून आली.

Photo of the march on November 8, 23 in Dharangaon city.
गावकऱ्यांनो, तुम्हाला आता गावातच मिळेल योजनांची माहिती अन्‌ लाभ! ३१ डिसेंबरपर्यंत संकल्प यात्रा; तुमच्या गावात कधी? वाचा सविस्तर

त्यानंतर धरणगाव राष्ट्रीय सुरक्षा मंच तर्फे पोलीस प्रशासनाविरुद्ध मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला. त्यानंतरही पोलीस प्रशासनाने कारवाई टाळली. धरणगाव पोलीस अधिकाऱ्यानी पोलीस अधीक्षकांना चुकीची माहिती तेव्हा दिल्याने कारवाई न झाल्याचे समोर आले आहे. 

या संदर्भात विधान परिषदेतील आ. प्रसाद लाड यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण तपासून कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. त्यामुळे आता संबंधित पोलीस निरीक्षकावर काय कारवाई होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Photo of the march on November 8, 23 in Dharangaon city.
Gajanan Taur Case: खोतकरांचा कट्टर समर्थक ते सराईत गुन्हेगार! कोण आहे गजानन तौर?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com