

Three Senior Citizens Rendered Unconscious in Jafarnagar Robbery as Caretaker Flees After Allegedly Drugging Them
sakal
नागपूर: आजारी ज्येष्ठ नागरिकांच्या देखभालीसाठी नेमलेल्या केअरटेकरने तिघांना गुंगीचे औषध देऊन घरातील सोने, भारतीय व विदेशी चलन असा सुमारे १६ लाख रुपयांचा ऐवज चोरला. ही घटना जाफरनगरातील सुरी लेआऊटमध्ये १७ ऑक्टोबरला उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी केअर टेकरविरोधात गुन्हा दाखल केला आहे.