

Jaideep Hardikar Honored with Ramoji Excellence Award 2025
Sakal
नागपूर : ग्रामीण भारताचा वेदनादायी चेहरा लेखनातून मांडणारे ज्येष्ठ पत्रकार, संशोधक जयदीप हर्डीकर यांना उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते रामोजी एक्सलन्स अवॉर्डने गौरविण्यात आले. पत्रकारितेतील मानाचा हा पुरस्कार हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटी येथे झालेल्या कार्यक्रमात हर्डीकर यांना प्रदान करण्यात आला. पद्मविभूषण दिवंगत रामोजी राव यांच्या जयंतीनिमित्त पत्रकारिता, ग्रामीण विकास, मानवतेची सेवा, कला आणि संस्कृती, युवा आयकॉन, विज्ञान आणि तंत्रज्ञानसह महिला सक्षमीकरण या सात क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी मान्यवरांचा रामोजी एक्सलन्स अवॉर्ड २०२५ देऊन गौरव करण्यात आला.