Jayant Patil : शरद पवार यांना ‘एनडीए‘त जायचेच नव्हते ; जयंत पाटील,प्रफुल पटेल दिशाभूल करीत आहे

खासदार प्रफुल पटेल यांनी आधीच भाजपसोबत जाण्याचे ठरवले होते. आता शरद पवार हेसुद्धा भाजपसोबत जाणार होते, असे सांगून ते लोकांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.
Jayant Patil
Jayant Patil sakal

नागपूर: खासदार प्रफुल पटेल यांनी आधीच भाजपसोबत जाण्याचे ठरवले होते. आता शरद पवार हेसुद्धा भाजपसोबत जाणार होते, असे सांगून ते लोकांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.

शरद पवार भाजप आघाडीत सहभागी करून घेण्यासाठी सर्वांचेच प्रयत्न होते. ते तयार असते तर सांगून गेले असते. मात्र, त्यांना भाजपची विचारसरणी स्वीकारण्यास नकार दिला, असे जयंत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. वर्धा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमर काळे यांच्या प्रचारासाठी ते विदर्भात आले असता नागपूर विमानतळावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Jayant Patil
Loksabha Election 2024 : न्यायाची हमी देणारा दस्तावेज ; काँग्रेसने मांडले ‘नवसंकल्प आर्थिक धोरण’

अमित शहा यांनी महाराष्ट्रातील दोन पक्ष फोडले. तरी देखील प्रतिसाद मिळत नाही. म्हणून नकली आणि असली हा वाद निर्माण केला जात आहे. मात्र महाराष्ट्रातील जनता हुशार आहे. ज्यांनी पक्ष फोडला त्यांच्या विरोधात ते आपला कौल देतील याची मला खात्री असल्याचेही पाटील म्हणाले. बारामती येथे सुप्रिया सुळेच विजयी होणार असल्याचे ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com