esakal | पूर असला तरी जेईई परीक्षा होणारच! उच्च न्यायालयाने मागणी केली अमान्य;  विद्यार्थ्यांना दिला हा पर्याय
sakal

बोलून बातमी शोधा

JEE exam can not be postponed said high court while hearing

जे विद्यार्थी पूरपरिस्थितीमुळे जेईई देऊ शकले नाहीत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करावा असे निर्देश देत, केंद्र आणि राज्य सरकार याबाबत निर्णय घेतील असे स्पष्ट केले.

पूर असला तरी जेईई परीक्षा होणारच! उच्च न्यायालयाने मागणी केली अमान्य;  विद्यार्थ्यांना दिला हा पर्याय

sakal_logo
By
मंगेश गोमासे

नागपूर : पूर्व विदर्भातील पूर परिस्थिती बघता शैक्षणिक कार्यकर्ता नितेश बावनकर यांनी येथील विद्यार्थ्यांची जेईई पुढे ढकलण्यात यावी अशा आशयाची याचिका सोमवारी (ता.31) उच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर झालेल्या सुनावणीत न्यायालयाने मागणी अमान्य करीत आजच परीक्षा घेण्यात येईल असे स्पष्ट केले.

याशिवाय जे विद्यार्थी पूरपरिस्थितीमुळे जेईई देऊ शकले नाहीत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करावा असे निर्देश देत, केंद्र आणि राज्य सरकार याबाबत निर्णय घेतील असे स्पष्ट केले.

हेही वाचा - तुकाराम मुंढे आतापर्यंत गप्प का होते? असा प्रश्न विचारत गाठले पोलिस स्टेशन

पूर्व विदर्भावर पुराचे सावट असल्याने भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी पुरात अडकले आहेत. त्यामुळे १ ते 6 सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या  जेईई मेन परीक्षा केंद्रावर पोहचण्याचे संकट ओढवले. असून यामुळे पूर्व विदर्भातील हजारो विद्यार्थी परीक्षेला मुकण्याची वेळ आली. विशेष म्हणजे दोन वर्षांपासून या परीक्षेची जेईईची तयारी करणारे विद्यार्थी प्रचंड मानसिक तणावात आहेत. 

यातूनच शैक्षणिक कार्यकर्ता नितेश बावनकर यांनी येथील विद्यार्थ्यांची जेईई पुढे ढकलण्यात यावी अशा आशयाची याचिका सोमवारी (ता.31) उच्च न्यायालयात दाखल केली होती. यावर आज सकाळी सुनावणी घेण्यात आली. त्यात न्यायालयाने जेईई आणि नीट रद्द करण्यास नकार देत,  विद्यार्थी पूरपरिस्थितीमुळे जेईई देऊ शकले नाहीत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करावा असे निर्देश देत, केंद्र आणि राज्य सरकार याबाबत निर्णय घेतील असे स्पष्ट केले. 

अवश्य वाचा - वेसण तोडून बैल आला घरी आणि बळीराजाने गोठ्याकडे घेतली धाव..नक्की काय घडले?

पहिला दिवस शांततेत

आज सकाळी 9 वाजतादरम्यान जेईई मेन शहरात दोन केंद्रावर घेण्यात आली. यामध्ये नॅशनल टेस्टिंग एजन्सी कडून सर्व सुविधांची अंमलबजावणी करीत शांततेत परीक्षा घेण्यात आली. मात्र, आज बी. प्लॅनिंग या अभ्यासक्रमाचा पेपर असल्याने विद्यार्थ्यांची गर्दी कमी असल्याचे समजते. मात्र, उद्यापासून बीई, बीटेक अभ्यासक्रमातील विद्यार्थी असल्याने गर्दी वाढण्याची शक्यता आहे.

संपादन - अथर्व महांकाळ