Nagpur News: शेती व घराच्या वाटणीवरून कळमेश्वर तालुक्यात सख्ख्या भावाने धाकट्या भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. मोहगाव सावंगी शिवारात घडलेल्या या गुन्ह्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
कळमेश्वर : शेती व घराच्या वाटणीवरून सख्ख्या भावाने धाकट्याचा खून केला. ही घटना तालुक्यातील मोहगाव सावंगी शिवारात शनिवारी (ता.१३) घडली. अरुण रामाजी तुरारे (वय ४३, वार्ड क्र.१५, धनगरपुरा, मोहपा, ता.कळमेश्वर) असे मृताचे नाव आहे.