Karhandla Tiger Safari : कऱ्हांडला येथील सहा चालक, सहा गाइड निलंबित एफ-२ वाघिणीला घेरणे भोवले

12 Safari Drivers and Guides Suspended at Karhandla : उमरेड-पवनी-कऱ्हांडला वन्यजीव अभयारण्यातील गोंठणगाव गेटजवळ एफ-२ वाघीण आणि तिच्या चार पिल्लांना सफारी वाहनांनी घेरल्याप्रकरणी वन विभागाने सहा चालक आणि सहा गाइड यांच्यावर सहा महिन्यांची बंदी घातली आहे.
Karhandla Tiger Safari

Karhandla Tiger Safari

esakal

Updated on: 

नागपूर : उमरेड - पवनी - कऱ्हांडला वन्यजीव अभयारण्यातील गोंठणगाव गेटजवळ एफ-२ वाघीण आणि तिच्या चार पिल्लांना घेरल्या प्रकरणी वन विभागाने सहा सफारी चालक आणि सहा गाइड अशा १२ कर्मचाऱ्यांवर सहा महिन्यांची बंदी घातली आहे.

२७ सप्टेंबर रोजी सकाळी ७.४५ वाजता हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येते. सफारी वाहनांनी वाघीण व तिच्या पिल्लांना गराडा घालून त्यांच्या मुक्त संचारात अडथळा आणल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

Karhandla Tiger Safari
ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात चौकशीचे आदेश, २० वर्षे जुन्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची फाइल पुन्हा उघडली

३० सप्टेंबर रोजी कर्मचाऱ्यांवरील कारवाईसंदर्भातील आदेश काढण्यात आला. त्यानुसार या कर्मचाऱ्यांवर १ ऑक्टोबर २०२६ ते मार्च २०२७ या कालावधीसाठी बंदी घालण्यात आली आहे.

Karhandla Tiger Safari
Horoscope 2027: २०२७ ठरणार खास! नोकरी, व्यवसाय अन् पैशांच्या बाबतीत मिळू शकतात मोठ्या संधी; ‘या’ ३ राशींचं नशीब चमकणार म्हणे

कारवाई झालेले गाइड व चालकांनी आरोप फेटाळले असून, आपण निर्दोष असल्याचा दावा केला आहे. मात्र संबंधीत गाईड आणि चालकांना त्यांची बाजू मांडण्याची संधी वनअधिकाऱ्यांनी दिली, असताना कारवाई झालेल्यांनी एफ-२ वाघीण पाहत असताना चूक झाल्याचे मान्य केले.

त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे पेंचचे उपसंचालक अक्षय गजभिये यांनी सांगितले. कारवाईत गाईड, चालकांसह बारा ते पंधरा जणांवर कारवाई झाल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com