esakal | नागपूर सुपर स्पेशालिटीमध्ये किडनीग्रस्तांना प्रत्यारोपणाची प्रतीक्षा
sakal

बोलून बातमी शोधा

सुपर स्पेशालिटीमध्ये किडनीग्रस्तांना प्रत्यारोपणाची प्रतीक्षा

किडनी प्रत्यारोपण सुरू करण्यात यावे, या मागणीसह विविध मागण्यांचे निवेदन नागपूर शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने मेडिकलच्या अधिष्ठातांकडे सादर केले.

सुपर स्पेशालिटीमध्ये किडनीग्रस्तांना प्रत्यारोपणाची प्रतीक्षा

sakal_logo
By
केवल जीवनतारे ः @kewalsakal

नागपूर: मेडिकलशी संलग्न सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये (super specialty Hospital) किडनी प्रत्यारोपण युनिट (Kidney transplant unit) उभारले. मात्र अनलॉक झाल्यानंतरही सुपर स्पेशालिटीमध्ये किडनी प्रत्यारोपण करण्यात येत नाही. यामुळे किडनी प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत ५० रुग्ण (Patient) आहेत. सुपरच्या किडनी प्रत्यारोपण विभागाचे नुतनीकरण न झाल्याने या केंद्रातील प्रत्यारोपणाला थांबा लागला आहे. किडनी प्रत्यारोपण सुरू करण्यात यावे, या मागणीसह विविध मागण्यांचे निवेदन नागपूर शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने मेडिकलच्या अधिष्ठातांकडे सादर केले.

हेही वाचा: सार्शी गाव जगावेगळे! गाईंना विश्रांतीसाठी ठेवल्या जातात चक्क गाद्या

नागपूर शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष दुनेश्वर पेठे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांची भेट घेतली. लॉकडाउनच्या तसेच कोरोना काळात मेडिकलमध्ये रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड झाली. रुग्णांना येथील असुविधांचा सामना करावा लागला. कोरोना वगळता इतर आजाराच्या रुग्णांना व्हेंटिलेटर उपलब्ध होत नाही. अंबू बॅगद्वारे रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा नातेवाईक करीत असल्याची तक्रार यावेळी अधिष्ठातांसमोर ठेवण्यात आली. सुपर स्पेशालिटीतील ह्दयक्रिया विभाग बंद आहे. किडनी प्रत्यारोपण बंद आहे.

हेही वाचा: नागपूरमध्ये नेट, मोबाईल नसलेल्या गरीब मुलांसाठी ऑफलाईन शाळा

शिष्टमंडळात वर्षा शामकुळे, महादेवराव फुके, जानबा मस्के, लक्ष्मी सावरकर, शैलेंद्र तिवारी, रिझवान अंसारी, नुतन रेवतकर, रविंद्र इटकेलवार, रमन ठवकर, प्रकाश लिखानकर, शैलेश पांडे, रविनीश पांडे, अशोक काटले, श्रीकांत शिवणकर, धनंजय देशमुख, महेंद्र भांगे, मुन्ना तिवारी, सुखदेव वंजारी, संतोष सिंह, शिव भेंड़े, स्वप्निल अहिरकर, रेखा कृपाले, विशाल खांडेकर, स्वाती कुंभलकर, अॅड. मृणाल भोंगाड़े, शबाना सैयद, ज्योती लिंग्यात, सुनीता खत्री, प्रमिला टैंभेकर, सीमा चारबे, सुषमा बंगाले, बाबाराव गावनडे, तनुज चौबे, अरविंद ढेंगरे, अशोक अड़िकने, तन्हा नागपुरी, मिलिंद मनापुरे, सैयद फजलुल्लाह, भय्या लाल ठाकुर, अनिल बोकड़े, विश्वजीत साबढ़िया, दिनेश देवगड़े, रूपेश बांगड़े, कमलेश जुगेले, शरद साहू, योगेश न्यायपारे, मोहन गुरुपंच, रोशन निर्मलकर, हेमंत चोरमार, अमित पिचकाटे, स्वप्निल जवेरी, नागेश वानखेडे, आकाश थेटे, अमन पाल, राजू कोहड़े, संजय चांदेकर, पंकज चौधरी, जतिन झाड़े, कपिल नारनौरे, दिनेश त्रिवेदी, प्रवीण पाटिल, सैयद रियाज़, कपिल सराफ, श्रीकांत नांदगांवे, मुकेश साहू, ईश्वर बंगाले, तौसीफ सैयद, विलास मालके, वसीम शेख, आतिश काळे, विश्वजीत तिवारी उपस्थित होते.

हेही वाचा: नागपूर : मध्यवर्ती कारागृहात टोळीयुद्ध; वर्चस्वासाठी राडा

दुपारी सुपर सुरु ठेवावे

दर दिवसाली दोन वाजता सुपरची ओपीडी बंद होते. ओपीडीसह सुपरच्या आवारात थाटलेले सारे औषधांची दुकानेही बंद होतात. गरीब रुग्णांना औषधांसाठी बाहेर जावे लागते. सुपर स्पेशालिटीचे औषधालय २४ तास सुरु ठेवण्यात यावे. दरवर्षी कोट्यावधीची औषधी शासनाकडून मिळत असताना गरीबांना निःशुल्क औषध मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. सुपरमध्ये डॉक्टर तसेच तंत्रज्ञांची २७ पदे रिक्त आहेत.

loading image