आपल्या मादीला आकर्षित करण्यासाठी तयार करतात सुंदर घरटं, पण हे पक्षी नेमके आढळतात कुठे?  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

know about birds who build nests for female birds

या प्रजातीतील अनेक नर पक्षी हे बहुपत्नीक आहेत. ते त्यांच्या मादीसाठी स्वतः घरटे बांधतात. त्यानंतर मादी एकटी मुलाचे संगोपन करतात. त्यामुळे मादी आपल्या जोडीदाराची निवड स्वतःच्या मताने करत असते.

आपल्या मादीला आकर्षित करण्यासाठी तयार करतात सुंदर घरटं, पण हे पक्षी नेमके आढळतात कुठे? 

नागपूर - ऑस्ट्रेलिया आणि जिनिया या दोन्ही देशात आढळणारा बोवरबर्ड्स हा पक्षी त्याच्या वेगळ्या वर्तवणुकीमुळे प्रसिद्ध आहेत. आपल्या जोडीदाराला म्हणजेच मादीला आकर्षित करण्यासाठी नर खूप मेहनत घेतो. तिच्यासाठी अंत्यत सुंदर घरटे तयार करतो. हे घरटं एखाद्या बाहुलीच्या घरासारखं दिसतं. यामध्ये फुले, पाने आणि मशरुमचा वापर केला जातो. हे घरटे नर पक्षी तयार करतात. त्यामध्ये अनेक रंगांचा वापर केला जातो. त्याद्वारे ते त्यांच्या मादीला आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. 

या प्रजातीतील अनेक नर पक्षी हे बहुपत्नीक आहेत. ते त्यांच्या मादीसाठी स्वतः घरटे बांधतात. त्यानंतर मादी एकटी मुलाचे संगोपन करतात. त्यामुळे मादी आपल्या जोडीदाराची निवड स्वतःच्या मताने करत असते. त्यामध्येही त्या निवडक नरालाच पसंती देतात.  सर्व पक्ष्यांमध्ये बोवरबर्डसचा विचित्र विवाह सोहळा असतो. या हुशार पक्ष्यांपासून आपणही धडा घेऊ शकतो. विशेषतः मुलाने आपल्या गर्लफ्रेंडला आकर्षित कसे करावे, याबाबत या पक्ष्यांकडून शिकण्यासारखे आहे.   

अधिक वाचा - पदवीधर मतदारसंघ निवडणूक: रिंगणात होते दोन अभिजीत वंजारी; पात्र ठरले एकच

न्यू जिनिया आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशाच्या जंगलात आपल्याला काही विचित्र पक्षी पाहायला मिळतात. त्यापैकीच बोवरबर्ड्स  आहेत. हे पक्षी फक्त मनमोहकपणे नृत्यच करत नाहीत, तर आपल्या मादीला आकर्षित करण्यासाठी अंत्यत सुंदर असं घरटं तयार करतात. हे घरटं एखाद्या बाहुलीच्या घरासारखं दिसतं. यामध्ये फुले, पाने आणि मशरुमचा वापर केला जातो. हे घरटे नर पक्षी तयार करतात. त्यामध्ये अनेक रंगांचा वापर केला जातो. त्याद्वारे ते त्यांच्या मादीला आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात.

 नर पक्षी अंत्यत सुंदर पद्धतीने हे घर तयार करतो. त्याला सजवतो. आपल्या मादीला आकर्षित करण्याचा प्रयत्न नर पक्षी करतात. नर हा मादीला घरटं बांधण्यासाठी मदत करत नाही तसेच मुलांचं संगोपन करण्यासाठीही मदत करत नाही. त्यामुळे कुठल्या नर पक्षाला आपला जोडीदार म्हणून निवडायचे याबाबत मादी खूप विचार करते. 

हेही वाचा - जेवण बेतले जीवावर; शहराबाहेर जेवण करण्यास गेलेल्या युवकांचा जागीच मृत्यू 

जर मादी आकर्षित झाली, तर ती घरट्यामध्ये प्रवेश करते. त्यानंतर तिला आकर्षित करण्यासाठी जो सुंदर घरटं तयार करतो त्याचे ती आभार मानते. त्यांच्या या एकमेव कृतीमुळे त्यांचं वागणं मानवांशी संबंधित असल्याचे दिसून येते. त्यामुळेच त्यांना सर्वात विलक्षण मानवी पक्षी म्हटले जाते. यांचा वेगळा विवाहसोहळा असतो. त्यामुळे सर्व मानव जातीने आपल्या जोडीदाराला आकर्षित कसे करायचे? याबाबत त्यांच्यापासून शिकण्यासारखे आहे.

संपादन - अथर्व महांकाळ