esakal | सोनेरी पहाट आणि उंच गुढीचा थाट! अशा पद्धतीनं करा गुढीची शास्त्रयुक्त पूजा; जाणून घ्या 
sakal

बोलून बातमी शोधा

know how to celebrate Gudhipadwa Nagpur news

महाराष्ट्रात नववर्ष हा गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो. कोरोनाच्या सावटाखाली गुढी उभारली जाणार आहे.

सोनेरी पहाट आणि उंच गुढीचा थाट! अशा पद्धतीनं करा गुढीची शास्त्रयुक्त पूजा; जाणून घ्या 

sakal_logo
By
राजेश रामपूरकर

नागपूर : चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो. यावेळी गुढीपाडव्याचा सण उद्या मंगळवारी साजरा होत आहे. यानिमित्ताने घरात वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवले जातात. भगवान ब्रह्मा आणि विष्णूची पूजा केली जाते. चैत्र महिन्यापासून नवीन वर्षाची सुरुवात होते. महाराष्ट्रात नववर्ष हा गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो. कोरोनाच्या सावटाखाली गुढी उभारली जाणार आहे.

गुढीपाडव्या निमित्ताने या दिवसापासून नवरात्रोत्साच्या पर्वालाही सुरुवात होणार आहे. गुढीपाडवा हे पर्व महाराष्ट्रासोबतच गोवा आणि केरळातही साजरा केला जातो. या भागांमध्ये हा दिवस ‘संवत्सर पडवो’ या नावानं ओळखला जातो. कर्नाटकमध्ये हा सण युगाडी पर्व या नावाने ओळखला जातो, तर आंध्रप्रदेश, तेलंगणमध्ये हा दिवस उगाडी, काश्मीरमध्ये ‘नवरेह’, मणिपूरमध्ये सजिबू नोंगमा पानबा या नावाने ओळखला जातो.

Success Story: हिरव्यागार शेतात वन्य प्राण्यांचा धुमाकूळ थांबणार; इंजिनियर्सनी बनवली...

कसा साजरा होतो गुढीपाडवा ?

गुढीपाडवा महाराष्ट्रात साजरा केला जातो. या दिवशी लोक नवीन कपडे घालतात. हा सण मित्र, कुटुंबातील सदस्यांसह आणि नातेवाईकांसोबत मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या विशेष दिवशी पुरणाची पोळी आणि श्रीखंड बनवले जाते. याशिवाय गोड भातही बनविला जातो.

गुढीपाडव्याचे महत्त्व

पौराणिक कथांनुसार, प्रतिपदेच्या तिथीला भगवान ब्रह्मा यांनी विश्वाची निर्मिती केली होती. यादिवशी भगवान ब्रह्माची विधीवत पूजा केली जाते. मान्यता आहे की या दिवशी पूजा केल्याने सर्व वाईट गोष्टींचा नाश होतो आणि घरात सुख-समृध्दी नांदते.

गुढीपाडव्याची तिथी आणि शुभ मुहूर्त
गुढीपाडव्याचा उत्सव – १३ एप्रिल २०२१

यंदाही पालखी आणि दिंडीविना होणार नववर्षाची सुरुवात; कोरोनामुळे गुढीपाडव्याचा उत्साह...

गुढी कशी उभारावी

  • गुढीची उंच काठी बांबूपासून तयार केली जाते. काठीला स्वच्छ धुऊन त्या काठीच्या वरच्या भागाला रेशमी वस्त्र किंवा साडी गुंडाळतात.
  • काठीला कडुलिंबाची डहाळी आंब्याची पाने, फुलांचा हार, साखरेची गाठी बांधून त्यावर तांबा, पितळ, किंवा चांदीचे गडू, तांब्या किंवा फुलपात्र बसविले जाते.
  • ज्या भागाला गुढी उभारायची आहे, तिथली जागा स्वच्छ करुन धुऊन पुसून घ्यावी. त्यावर रांगोळी काढून पाट ठेवून गुढीची काठी ठेवावी.
  • तयार केली गुढी दारात, उंच गच्चीवर, गॅलरीत लावावी.
  • गुढीची काठी नीट बांधून काठीला गंध, फुले, अक्षता वाहून गुढीची पूजा करावी.
  • निरंजन लावून उदबत्ती ओवाळावी.
  • दूध, साखर, पेढ्यांचा नैवेद्य दाखवावे.
  • दुपारी गुढीला गोडधोडाचे नैवेद्य दाखवावे.
  • संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी परत हळद-कुंकू, फुले, अक्षता, वाहून गुढी उतरवावी. 

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image