
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचा स्थापना दिन (Nationalist Congress Foundation Day) १० जूनला असल्याने त्यापूर्वीच नागपूर शहराचा अध्यक्ष निवडण्याच्या हालचालींना वेग आला आहे. शहरातील काही पदाधिकाऱ्यांना तातडीने मुंबईला बोलवण्यात आले आहे. त्यामुळे बुधवारी अध्यक्षाचे नाव जाहीर करण्यात येणार असल्याचे समजते. अध्यक्षपदासाठी आघाडीवर असलेले पेठे, पवार यांच्या नावामध्ये आता कुंटे पाटील (Kunte Patil) यांच्या नावाची भर पडली आहे. (Kunte-Patil-in-the-race-for-NCP's-Nagpur-city-president-post)
अनिल अहीरकर यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला असून त्यांना बढती देऊन प्रदेश कार्यकारिणीत उपाध्यक्ष करण्यात आले आहे. शहराच्या अध्यक्षाची निवड अद्याप व्हायची आहे. नगरसेवक दुनेश्वर पेठे आणि जय जवान जय किसानचे अध्यक्ष प्रशांत पवार यांची नावे अध्यक्षपदासाठी सर्वाधिक आघाडीवर आहे. मात्र, या दोन्ही नावांना अंतर्गत विरोध सुरू झाला आहे.
याच कारणाने तातडीने अध्यक्ष जाहीर करण्याचे राष्ट्रवादीने टाळल्याचे समजते. त्यामुळे माजी शहराध्यक्ष तसेच प्रदेश प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील यांचे नाव आता समोर आले आहे. मुंबईला तातडीने रवाना होणाऱ्या नेत्यांमध्ये त्यांचाही समावेश आहे. ते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे अत्यंत जवळचे आहेत. त्यामुळे कुंटे यांचे नाव जाहीर झाल्यास आश्चर्य वाटणार नाही असे राष्ट्रवादीच्या एका नेत्याने सांगितले.
औत्युक्य ठेवले कायम
या घडामोडींसंदर्भात कुंटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मुंबईला पक्षाच्या नव्हे तर खाजगी कामासाठी जात असल्याचे सांगितले. अध्यक्षपदाबाबत विचारणा केली असता त्यांनी कानावर हात ठेवले. सोबतच पक्षादेश अंतिम मानू असे सांगून त्यांनी औत्युक्य कायम ठेवले.
(Kunte-Patil-in-the-race-for-NCP's-Nagpur-city-president-post)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.