मेडिकल : थायरॉइड किटचा तुटवडा; गरिबांना दाखवतात खासगीचा रस्ता

nagpur medical college
nagpur medical college canva

नागपूर : पुरवठादारांचे थकीत बिल मंजूर होत नसल्याने मेडिकलमधील (Government Medical College) विविध वस्तूंचा पुरवठा थांबतो. ३१ मार्चपर्यंत कोणतीही साधनसामग्री खरेदी करू नका, असे शासनाचे आदेश आले होते. मात्र, याचा हजारो रुग्णांना फटका बसला आहे. सध्या मेडिकलमध्ये थायरॉइड किट (Thyroid kit) संपल्याने महिला रुग्णांना दररोज खासगीचा (The poor suffer) रस्ता दाखवला जात असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. (Lack-of-thyroid-kit-in-medical-college-in-Nagpur)

मेडिकलमध्ये वर्षभरात तीन लाखांहून अधिक चाचण्या होतात. यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे रसायन (केमिकल) लागते. रुग्णांच्या निदानासाठी लागणारे रिऐजन्ट-केमिकल (रसायन) उपलब्ध करून देणे ही सरकारची जबाबदारी आहे. थायरॉईडची चाचणी करणारे ‘सिमेन्स’ कंपनीचे यंत्र मिळाले. परंतु, केमिकलची (रिऐजन्ट) बिले थकीत असल्याने यंत्रदेखील बंद पडलेली दिसतात. याचा मनस्ताप रुग्णांना सहन करावा लागतो. या चाचण्यांचे दर गरिबांच्या आवाक्यात नाही.

nagpur medical college
धोका वाढला! 'मेडिकल'च्या कोविड वॉर्डात दहा मुले भरती

गर्भवती मातांना थायरॉइड चाचणी करणे सक्‍तीचे आहे. थायरॉइड हायपर आणि हायपो दोन प्रकारात असतो. त्यातल्या पहिल्या प्रकारात रुग्णांना अस्वस्थता, हृदयाचे ठोके वाढतात. वजन कमी होते. अतिसार होतो. डोळ्यांचा आकार वाढतो. उच्च रक्तदाबाचाही त्रास होतो. तर दुसऱ्या प्रकारात थकवा येऊन चक्कर येते. वजन वाढते. मलावरोध होऊन पोट साफ होत नाही. या दोन्ही प्रकारात उपचाराचे निदान करणे आवश्‍यक असते.

गर्भवतींमध्ये सकस आहार तसेच आयोडीनची कमतरता असल्याने थायरॉइड होण्याची शक्‍यता असते. गर्भवती असताना या आजाराचा परिणाम बाळावर होऊ नये यासाठी ही चाचणी सक्तीची असते. एक हजारात ८० महिला थायरॉईडने ग्रस्त असतात. असे भयावह चित्र असतानाही थायरॉइड किटची खरेदी का होत नाही, असा सवाल गरीब रुग्णांचा असून या विरोधात आंदोलन करण्यात येईल, असे वंचितचे सिद्धांत पाटील म्हणाले. यासंदर्भात नुकतेच राज्याचे वैद्यकीय शिक्षण व संशोधन मंत्री अमित देशमुख यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.

nagpur medical college
वाढदिवसापूर्वीच 'ती' निघून गेली, आईने फोडला टाहो

नावालाच सुपर?

मेडिकलशी संलग्न सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने किडनी प्रत्यारोपणाचा पल्ला गाठला. हृदयावरील बायपासपासून तर ऍन्जिओप्लास्टीमध्ये आघाडीवर आहे. पोटाचे विकार आणि मेंदू विकारग्रस्तांसाठी सुपर वरदान ठरत आहे. येथील पॅथॉलॉजी आणि जीवरसायन विभागात उत्तम काम होत असल्याचे दिसून येते. मात्र, विदर्भाचे सुपर स्पेशालिटी असलेल्या या हॉस्पिटलमध्ये थायरॉइड निदानाची सोय नाही. सुपरमध्ये तंत्रज्ञ नसल्याने नाइलाजास्तव गरीब रुग्णांना येथेही खासगीचा रस्ता दाखविला जातो. सुपर हे मेडिकलशी संलग्न आहे, यामुळे एका मेडिकलमध्ये थायरॉईड चाचणी होते, असे सांगून बोळवण केली जाते.

(Lack-of-thyroid-kit-in-medical-college-in-Nagpur)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com