
Ladki Bahin Yojana
sakal
नागपूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पारदर्शकतेला प्राधान्य देत सरकारने ई-केवायसी करणे बंधनकारक केले. परंतु ई-केवायसीसाठीच्या सर्व्हरमध्येच तांत्रिक अडचण येत असून ओटीपी येत नाही. त्यामुळे आपला लाभ तर बंद होणार नाही ना? अशी भीती महिलांना सतावत आहे.