

lavani at ncp office nagpur
ESakal
नागपुरातून एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. यामुळे आता राजकारणात नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात लावणीचे सादरीकरण करण्यात आले आहे. या लावणीच्या सदरीकरणामुळे वाद होण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नागपूर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची दिवाळी स्नेहमिलन सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी हा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पक्षातील एका नेत्याने स्पष्टीकरण दिले आहे.