
धानोरा : अंबाजोगाई तालुक्यातील माकेगाव येथील शेतकरी रवी देशमुख यांच्या बैलावर सोमनाथ बोरगाव शिवारात बिबट्याने हल्ला केला असून या हल्ल्यात बैल ठार झाला आहे ही घटना गुरुवार ता. २८ रोजी संध्याकाळी घडली आहे.जवळगाव, पुस शिवारात बुधवार रात्री बिबट्या ऊसाच्या फडातुन बाहेर निघाल्याचे अनेक शेतकर्यांनी पाहिले.