
नागपूर : बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा प्राणीसंंग्रहालयाच्या बाहेरील क्षेत्रात असलेल्या एका बिबट्याने पिंजऱ्यामध्ये शिरून प्राणीसंग्रहालयातील मादी बिबट्याला गंभीर जखमी केले. गंभीर जखमी अवस्थेत बिबट्यावर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार केले. परंतु, मादी बिबट्याचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला.