सरकारी कार्यालय परिसरात दारूच्या बाटल्यांचा खच

bottles
bottlese sakal
Updated on

नागपूर : मुंबई येथील मंत्रालय परिसरात दारूच्या बाटल्या सापडल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर उपराजधानीतील शासकीय कार्यालयात (government offices nagpur) फेरफटका मारला असता, वन विभागासह आरोग्य उपसंचालक कार्यालय परिसरात दारूच्या बाटल्याचा (liquor bottles in government offices ) खच दिसून आला. यावरुन काही कर्मचारी कार्यालय सुटल्यानंतर दारू रिचवून आवारातच बाटल्या फेकून दिल्याचे दिसून येते. हीच स्थिती अनेक शासकीय कार्यालयात असल्याचे बोलले जाते.

bottles
विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! लवकरच मिळणार मोफत पुस्तके

वन विभागाच्या विश्रामगृहामध्ये मद्यपान आणि मासांहारावर बंदी आहे. मात्र, वन विभागाच्या नागपूर मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) व अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) कार्यालयाच्या परिसरात दारूच्या बाटल्यांचा खच सापडला. हा परिसर वन विभागाच्या अख्यत्यारित नसला तरी तेथे वनविभागातील कर्मचारी कार्यालय सुटल्यानंतर दारुचे पेग रिचवतात. त्यामुळे वन विभागातील महिला कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. दारूच्या बाटल्या सापडल्यानंतर मात्र अनेक अधिकाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले. या प्रकाराबाबत उपवनसंरक्षक डॉ. भरत हाडा यांच्याशी संपर्क केला असता, यासंदर्भात माहिती नाही. त्या परिसराची पाहणी करून चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले. यापूर्वी २०१८ मध्येही नागपुरातील विधानभवन परिसरात विधानसभा अध्यक्षांसह विविध मंत्र्यांच्या उपस्थितीत विधानभवन परिसरात तुंबलेल्या गटाराचे झाकण काढले असता आत दारूच्या बाटल्यांचा खच सापडला होता.

आरोग्य उपसंचालक कार्यालय

माता कचेरी परिसरातील आरोग्य उपसंचालक कार्यालयाच्या आवारात विविध इमारतींमध्ये रात्रीच्या वेळी दारू पार्ट्या रंगल्यानंतर परिसरात दारूच्या बाटल्या फेकून देण्यात येत असल्याचे चित्र येथे आढळून आलेल्या दारूच्या बाटल्यांवरून दिसते. आरोग्य उपसंचालक कार्यालयात परिसरातून फेरफटका मारल्यानंतर वसतिगृह, तसेच च्या सभोवताल दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला आढळून आला. आरोग्य उपसंचालक कार्यालय परिसरात असलेल्या प्रशिक्षण संस्थेच्या वसतिगृहातून बाहेर निघाल्यानंतर बाहेर निघताना रस्त्याच्या कडेला झुडपांमध्ये दारूच्या बाटल्या फेकून देण्यात येतात. यावरून येथे पार्टी रंगत असल्याची जोरदार चर्चा येथे आहे. आरोग्य विभागाच्या या परिसरात फेरफटका मारल्यानंतर सभोवतालच्या झुडपांमध्ये दारूच्या बाटल्या पडून असतात. राज्यात औषधांची खरेदी प्रक्रिया हापकिनकडे सोपविण्यात आल्यामुळे रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा पसरलेला असला तरी आरोग्य विभागाच्या परिसरात दारूचा सुकाळ मात्र परिसरात फेकण्यात आलेल्या बाटल्यांमुळे दिसते. यासंदर्भात अधिकाऱ्यांनी चुप्पी साधली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com