पशुधन महामंडळ ८१ रुपयांत देणार वीर्यमात्रा

पशुधन महामंडळ ८१ रुपयांत देणार वीर्यमात्रा
Updated on

नागपूर : दुधाचे उत्पादन (Milk production), पशुधन वाढविण्यासाठी व मादी जातीच्या जनावरांची पैदास करण्यासाठी राज्याच्या पशुधन विकास महामंडळाने (Livestock Development Corporation) पुढाकार घेतला आहे. कृत्रिम रेतनातून मादी जातीच्या वीर्याची मात्रा जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या दवाखान्यातून लवकर पशुपालकांना उपलब्ध होणार आहे. वीर्यमात्रा बाजारदरा पेक्षा अतिशय कमी किमतीत म्हणजे ८१ रुपयांत मिळणार आहे. (Livestock-Corporation-will-provide-semen-for-Rs-81)

जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या मालकीचे ९४ उच्चश्रेणी दवाखाने तर राज्य शासनाचे ६५ श्रेणी दोनचे दवाखाने आहे. पशुपालकांना मादी जातीच्या जनावरांसाठी ३० जुलैपर्यंत या मात्रेची नोंदणी स्थानिक पशू दवाखान्यात करायची आहे. गायीमध्ये एचएफ, जर्सी शंभर टक्के, क्रॉसब्रिड, सायीवाल, गीर, हरयाणा व म्हशीमध्ये मुऱ्हा जातीचे वीर्य मात्रा उपलब्ध राहील. यातून निर्माण होणाऱ्या कालवडी या उच्च दर्जाच्या असतील.

पशुधन महामंडळ ८१ रुपयांत देणार वीर्यमात्रा
अन् चोरटा घुसला शौचालयात; मालकाने घेतली कडी लावून

वीर्यमात्रेची किंमत खुल्या बाजारपेठेत १,५०० रुपये इतकी आहे. मात्र, पशुपालकांना किमतीअभावी ते विकत घेणे शक्य नव्हते. आता केंद्र, राज्य आणि दूध संघ आणि ज्याठिकाणी दूध संघ नाही. अशाठिकाणी महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ या वीर्यमात्रेचा खर्च उचलणार आहे. शेतकऱ्यांना ४० रुपये अधिक कृत्रिम रेतनासाठी शासनास देय असलेले सेवाशुल्क ४१ रुपये, असे फक्त ८१ रुपये अदा करावे लागेल. पशुधन विकास महामंडळाने राज्यपातळीवर एबीएस कंपनीशी करारनामा केला आहे. या योजनेमुळे नागपूर जिल्ह्यासह राज्यातील गोधनात वाढ होईल, असा दावा पशुसंवर्धन विभागाचा आहे.

या प्रयोगामुळे जिल्ह्यात उच्च दर्जाच्या गोवंशाची निर्मिती होऊन दुग्ध उत्पादनात वाढीस मदत होईल. तसेच शेतकऱ्यांना लाभ होणार असून पैशांची बचत होईल.
- तापेश्वर वैद्य, सभापती, कृषी व पशुसंवर्धन विभाग, जि. प.
पशुधन महामंडळ ८१ रुपयांत देणार वीर्यमात्रा
मैत्रीतून सुरू झाला मैत्री गृहोद्योग; व्यवसाय आला नावारूपाला
नोंदणी प्रक्रिया स्थानिक स्तरावरील पशुदवाखान्यात नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
- उमेश हिरुडकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकार, जि. प.

(Livestock-Corporation-will-provide-semen-for-Rs-81)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Nagpur
Nagpur
The Maharashtra government inaugurated nine infrastructure projects worth Rs 484 crore, including a four-lane railway overbridge in Nagpur.
The Maharashtra Government has approved Rs 4 lakh compensation for the family of a Warkari who died during the Ashadhi Wari under the Vitthal Rakhumai Warkari Yojana.
Marathi News Esakal
www.esakal.com