
नागपूर : राष्ट्रवादी आणि शिवसेनेसोबत महापालिकेच्या निवडणुकीत महाआघाडी (Mahavikas aaghadi) केल्यास भविष्यात होणाऱ्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीत मोठा फटका काँग्रेसला बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढायची आणि निकालानंतर एकत्र यायचे असा फॉर्म्युला काँग्रेसमार्फत समोर करण्यात आला आहे.
शहरात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (congress) फारसे अस्तित्व नाही. शिवसेनेचे दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एकच नगरसेवक आहे. निवडून आलेले नगरसेवक स्वतःच्या ताकदीवर आले आहेत. त्यात त्यांच्या पक्षाचे फारसे योगदान नाही. मध्य आणि दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे कार्यकर्ते दिसतात. उर्वरित चार मतदारसंघात तोंडी लावायलासुद्धा दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते नाहीत. शिवसेनेचे निवडून आलेले दोन नगरसेवक एकाच प्रभागातील आणि दक्षिण नागपूरमधील आहेत.
राष्ट्रवादीला पंधरा वर्षात स्वतःचे अस्तित्व निर्माण करता आले नाही. आजवर काँग्रेसच्या (congress) बळावर आठ-दहा नगरसेवक निवडून येत होते. स्वतंत्रपणे लढल्यानंतर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची संख्या एकवर येऊन ठेपली आहे. महविकास आघाडी झाल्यास दोन्ही पक्षांना प्रत्येकी २५ यानुसार ५० जागा सोडाव्या लागणार आहे. त्यानंतर प्रभागामध्ये एक मत काँग्रेसला, दुसरे मते राष्ट्रवादीला (National congress party) आणि तिसरे मत शिवसेनेसाठी मागावे लागेल. त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची जास्त शक्यता आहे. यात अनेक मते अवैध ठरण्याचाही धोका आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी (National congress party) ५० जागा सोडल्यास त्यांच्या भागात पंजा दिसणार नाही. त्यामुळे काँग्रेसचे मतपेढी आणि टक्केवारीसुद्धा सहाजिकच कमी होणार आहे. त्यानंतर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूक लढताना काँग्रेसच्या उमेदवारांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे महाविकास आघाडीच्या घटक पक्षाने स्वबळावर निवडणूक लढाव्या, त्यानंतर एकत्र यावे असा युक्तिवाद काँग्रेसचा (congress) आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.