
नागपूर - बिटकॉईनध्ये गुंतवलेल्या पैशाच्या वाटाघाटीतून वाशिम जिल्ह्यातील मालेगावातील माधव यशवंत पवार (३८, आराधनानगर) हत्याकांड घडले असून अवघ्या तीन दिवसांत गुन्हे शाखेने हत्याकांडाचा छडा लावला. या हत्याकांडात तीन आरोपींना अटक केली. हत्याकांडाचा मास्टरमाईंड आणि तिन आरोपी फरार झाले आहेत. विक्की उर्फ विकल्प विनोद मोहोड, शुभम उर्फ लाला भीमराव कन्हारकर, व्यंकटेश उर्फ टोनी मिसन भगत (तीनही रा. आराधनानगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. मुख्य आरोपी निशिद महादेव वासनिक, गज्जू उर्फ गजानन मुलमुले आणि अंजली नावाची कॉलगर्ल असे तिघे पळून जाण्यात यशस्वी झाले.
माधव पवार हा मुळचा सोलापूर असून तो नागपुरातील एका इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीत कामाला होता. अकाऊंटमध्ये हुशार असलेल्या माधवने एका वर्षांतच ९९ लाखांचा स्कॅम केला. याप्रकरणी न्यायालयाने २०१३ साली माधवला आठ वर्षाची शिक्षा सुनावली होती. त्याच दरम्यान निशिद देखील कारागृहात होता. कारागृहात असताना माधवकडे तुरूंगाधिकाऱ्याचा रायटर म्हणून काम सोपवले होते. त्यामुळे त्याची निशिदसह कारागृहातील अन्य कैद्यांशी ओळख झाली होती. निशिद कारागृहातून बाहेर आला होता.
त्यानंतर फेब्रुवारी २०२१ मध्ये माधव देखील कारागृहातून बाहेर आला. कारागृहातून बाहेर आल्यानंतर निशिदने पुन्हा ‘ईथर ट्रेड आशिया’ या नावाने बिट क्वॉईनचा व्यवसाय सुरू केला होता. त्याने गणिताचा बादशहा माधवला व्यवसायात सल्लागार म्हणून घेतले. माधवकडे बिट क्वॉईन संदर्भात हॉटेलमध्ये सेमीनार भरविण्याचे काम होते. बिट क्वॉईनच्या व्यवहारातील संपूर्ण हिशेब माधव ठेवत होता. या धंद्यात निशिदने ग्राहकांची फसवणूक करून कोट्यवधी रुपयांनी लुबाडले होते. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी निदशिच्या विरोधात एप्रिल २०२१ मध्ये कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
असे आहे हत्याकांडाचे कारण
निशिदवर गुन्हा दाखल होताच तो कुटुंबियांसह फरार झाला होता. मात्र, माधव नागपुरातच होता. बिट क्वॉईन धंद्यातील कोट्यवधीचा हिशेब माधवच्या मोबाईलमध्ये सेव्ह होता. हा मोबाईल निशिद मागत होता. परंतु, मोबाईल देण्यासाठी माधव टाळाटाळ करीत होता. १८ ऑगस्टपासून निशिद हा मोबाईलसाठी माधवच्या मागे लागला होता. त्यामुळे निशिदने माधव ‘गेम’ करण्याचा प्लान केला.
सुंदर तरुणीचे आमिष
माधव हा आंबटशौकीन होता. हे निशिदला माहिती होते. त्याने नागपुरातील अंजली नावाच्या कॉलगर्ल सोबत घेतले. त्यानंतर माधवला व्हिडिओ कॉल करून अंजलीसोबत फार्महाऊसवर रात्री मुक्काम असल्याचे सांगितले. अंजलीमुळे माधवने येण्यास होकार दिला. निशिदने त्याला कारमध्ये घेतले आणि वाशिमला पळवून नेले. रस्त्यात त्याला मोबाईलबद्दल विचारणा केली. मात्र तो टाळत होता. त्यामुळे मालेगावजवळील शेतात कार थांबवली. तेथे पिस्तुलातून तीन गोळ्या झाडून त्याचा खून केला.
सीडीआरवरून आरोपी जाळ्यात
माधवच्या मोबाईलवर निशिदसोबत बोलणे झाले होते. त्यामुळे गुन्हे शाखेच्या युनिट चारचे विश्वनाथ चव्हाण यांच्या पथकाने निशिदच्या सहकाऱ्यांवर नजर ठेवली. त्यात ड्रायव्हर विक्की मोहोड आणि शुभम कन्हारकरला ताब्यात घेऊन विचारपूस सुरू केली. त्याचप्रमाणे त्यांचे मोबाईलचे लोकेशन काढले असता ते लोकेशन मालेगावचे निघाले. त्यावरून पोलिसांनी आरोपींना अटक केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.