"आपली बस'मध्ये माफियाराज... वाचा काय आहे प्रकार

"Mafiaras on your bus ... read what kind of thing
"Mafiaras on your bus ... read what kind of thing

नागपूर : मनपाच्या "आपली बस'मधील वाहकांना (कंडक्‍टर) कामठी व खापरखेड्यातील कुख्यात गुंडाची मदत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. वाहकांना मनपा तिकीट तपासणीसबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकाला अटक करण्यात आली. त्यानेच पोलिसी हिसक्‍यानंतर गुंडांची नावे सांगितली. त्यामुळे "आपली बस'वर माफियाचे वर्चस्व असल्याचेही अधोरेखित झाले.

महापालिकेच्या आपली बसमधील कंडक्‍टरला तिकीट तपासणी येत असल्याची माहिती देण्यासाठी वेगवेगळे व्हॉट्‌सअप ग्रुप तयार करण्यात आले आहे. महापालिका परिवहन विभागाने नियुक्त केलेल्या डिम्स कंपनीचे तिकीट तपासणीस भारत चव्हाण, निलय प्रजापती व राहुल येवले कामठीकडे जात होते. शुभम काशीनाथ भुरे हा तरुण दुचाकीवरून या तिघांचाही पाठलाग करताना दिसून आला. एवढेच नव्हे तर तिन्ही तिकीट तपासणीबाबत तो कंडक्‍टर व बसचालकांना सतर्क करीत असल्याचेही आढळून आले. याबाबत तिकीट तपासणीस यांनी वरिष्ठ अधिकारी व परिवहन समिती सभापती बाल्या बोरकर यांना माहिती दिली.

बाल्या बोरकर यांनी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या घटनेची माहिती दिली. आयुक्त मुंढे यांनी याप्रकरणी पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्यासोबत चर्चा केली. पोलिस आयुक्तांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना शुभम भुरे नावाच्या तरुणाचा शोध घेण्याचे व अटक करण्याचे निर्देश दिले. कामठी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष बाकल यांनी तत्काळ शुभम भुरेला अटक केली. त्याला पोलिसी खाक्‍या दाखवताच कंडक्‍टरचा व्हॉट्‌स अप ग्रुपच नव्हे तर आपली बसमधील कंडक्‍टरवरही कामठी येथील कुख्यात गुंड वसिम व खापरखेडा येथील गुंड मोनू यांचे नियंत्रण असल्याची बाब पुढे आली आहे. भुरे यांनी याप्रकरणात या दोन्ही गुंडांची नावे घेतल्याने शहर बसवर गुंडाचेच अधिपत्य असल्याचे दिसून येत आहे.

बडतर्फ वाहक ठरले उपद्रवी

गेल्या काही महिन्यांत व्हॉट्‌स ऍप ग्रुप तयार करून तिकीट तपासणीसबाबत कंडक्‍टरला माहिती पुरविणाऱ्या काही कंडक्‍टर व बसचालकांना महापालिकेच्या डिम्स कंपनीने बडतर्फ केले. बडतर्फ करण्यात आलेले कंडक्‍टर व बसचालक आता महापालिकेच्या बस सेवेला मोठा उपद्रव ठरत असल्याचेही यानिमित्त पुढे आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com