

BJP will contest the upcoming Nagpur Municipal Corporation election independently says Krushna Khopde
Sakal
नागपूर : महानगर पालिकेच्या आठ वर्षानंतर होत असलेली निवडणुक ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. कार्यकर्त्यांचा स्वाभिमानाचा प्रश्न आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेची ही निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे आमदार कृष्णा खोपडे यांनी सांगितले. लोकसभा व विधानसभा या केंद्र व राज्य सरकारच्या निवडणुका असल्यामुळे त्यात युती होणे योग्य आहे. परंतु, मनपा निवडणूक ही बूथपासून निर्माण होणाऱ्या कार्यकर्त्याची असल्यामुळे भाजप विकासाचा मुद्दा घेऊन जनतेसमोर जाणार आहे.