Winter Session: हिवाळी अधिवेशनावेळी विधानभवनावर धडकणार १४ मोर्चे! सामान्य नागरिक आणि वाहतूक पोलिसांची लागणार कस

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महामोर्चासह विधानभवनावर सोमवारी (११ डिसेंबर) रोजी एकूण १४ मोर्चे धडकणार आहेत.
Winter Session: हिवाळी अधिवेशनावेळी विधानभवनावर धडकणार १४ मोर्चे! सामान्य नागरिक आणि वाहतूक पोलिसांची लागणार कस

Maharashtra Assembly Winter Session: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महामोर्चासह विधानभवनावर सोमवारी (११ डिसेंबर) रोजी एकूण १४ मोर्चे धडकणार आहेत.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातील पहिल्याच सोमवारी पोलिसांसह वाहतूक करणाऱ्या सामान्य नागरिकांची कस लागणार आहे.

या १४ मोर्च्यांमध्ये काँग्रेसच्या वतीने विविध मागण्यांसाठी दीक्षाभूमी येथून मोर्चा निघणार आहे. यासह यशवंत स्टेडियम येथून विदर्भ ज्वाइंट ॲक्शन कमेटी, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समिती वर्धा आणि भारत राष्ट्र समितीतर्फे विधानभवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे. हे चार मोर्चे मॉरिस कॉलेज पॉइंट येथे अडविण्यात येतील.

यशवंत स्टेडियम येथूनच महाराष्ट्र राज्य वीज कंत्राटी कामगार संघ, विदर्भ प्रदेश अखिल हिंद ब्लॉक व विदर्भ राज्य जन जनार्धन किसान सेल, ऑल महाराष्ट्र फेयर फ्राईज शॉपकिपर्स फेडरेशन पुणे, सकल धनगर समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्य, राज्यस्तरीय कर्णबधिर असोसिएशन जालना, ठगी पिढी जमाकर्ता परिवार आणि समग्र शिक्षा करार कर्मचारी श्रमिक संघतर्फे मोर्चे विधानभवनावर धडकणार आहे.

हे सात मोर्च टेकडी रोड पॉइंटवर थांबविण्यात येतील. इंदोरा मैदान येथून जनसेवा गोंडवाना पार्टीचा मोर्चा आणि अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचा मोर्चा एलआयसी चौक येथे अडविण्यात येईल. मंगळवारी बाजार येथून निघणारा महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे मोर्चा लिबर्टी टॉकीज चौक येथे थांबविण्यात येईल. (Latest Marathi News)

Winter Session: हिवाळी अधिवेशनावेळी विधानभवनावर धडकणार १४ मोर्चे! सामान्य नागरिक आणि वाहतूक पोलिसांची लागणार कस
Gopichand Padalkar: गोपीचंद पडळकरांवर झालेल्या चप्पलफेक प्रकरणात अखेर १० ते १५ मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com