Winter Session: राष्ट्रवादीची संघर्ष यात्रा आज विधानभवनावर धडकणार! शरद पवारांबरोबरच 'हे' नेते होणार सहभागी

राष्ट्रवादी काँग्रेसची संघर्ष यात्रा मंगळवारी विधानभवनावर धडकणार आहेत.
Winter Session: राष्ट्रवादीची संघर्ष यात्रा आज विधानभवनावर धडकणार! शरद पवारांबरोबरच 'हे' नेते होणार सहभागी

Nagpur NCP March on Assembly: राष्ट्रवादी काँग्रेसची संघर्ष यात्रा मंगळवारी विधानभवनावर धडकणार आहेत. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासह शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग सहभागी होणार आहेत.
आमदार रोहित पवार आठशे किलोमीटरचा प्रवास करून नागपूरमध्ये दाखल झाले आहेत.

मंगळवारी दुपारी एक वाजता सिव्हील लाईन्स येथील जवाहर विद्यार्थी गृह येथून संघर्ष यात्रा विधानभवनाकडे कूच करणार आहे. लॉ कॉलेज चौक, बोले पेट्रोल पंप, महाराजबाग चौक, व्हेरायटी चौक, बर्डी मेन रोड मार्गाने मानस चौकात येऊन टेकडी रोड येथे ती येईल. कापूस, सोयाबीन, धान, संत्रा, तूर व इतर शेतमालास योग्य भाव द्या, पिक विमा योजनेचा लाभ देण्यात यावा, अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्या, राज्यातील विविध खात्यातील रिक्त पदे त्वरित भरा,

महिला सुरक्षेसाठी शक्ती कायदा, कंत्राटी नोकरभरती रद्द करा, ड्रग्जच्या विळख्यात अडकत चाललेल्या तरुणाईला वाचवा, जातीनिहाय जनगणना करावी, शाळा दत्तक योजना रद्द करा आदी विषयांकडे सरकारचे लक्ष वेधण्यात येणार आहे. दुपारी दोन वाजता झिरोमाईल येथे यात्रेचे रुपांतर सभेत होणार आहे. या सभेला महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेत्यांना निमंत्रित करण्यात आले असल्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कळविले आहे. (Latest Marathi News)

Winter Session: राष्ट्रवादीची संघर्ष यात्रा आज विधानभवनावर धडकणार! शरद पवारांबरोबरच 'हे' नेते होणार सहभागी
Share Market Opening: बाजार उघडताच निफ्टीने गाठला नवा उच्चांक, सेन्सेक्सनेही पार केला 70,000चा टप्पा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com