Share Market Opening: बाजार उघडताच निफ्टीने गाठला नवा उच्चांक, सेन्सेक्सनेही पार केला 70,000चा टप्पा

Share Market Opening: शेअर बाजारात रेकॉर्डब्रेक तेजी सुरूच आहे.
Share Market Opening latest updates in marathi
Share Market Opening latest updates in marathi Sakal
Updated on

Share Market Opening Latest Update 12 December 2023: चांगल्या जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात रेकॉर्डब्रेक तेजी सुरूच आहे. प्रमुख बाजार निर्देशांकांनी मंगळवारी नवीन उच्चांक गाठला. निफ्टीने प्रथमच 21,031 ची पातळी गाठली. सेन्सेक्सही 70000 च्या वर पोहोचला.

मेटल, फार्मा आणि पीएसयू बँकिंग शेअर्सनी बाजार वाढण्यास हातभार लावला आहे. याशिवाय विमा क्षेत्रातही वाढ नोंदवली जात आहे. एसबीआय लाइफ आणि एचडीएफसी लाइफ निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढले आहेत.

मिडकॅपमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ

बँक निफ्टी आज सुमारे 110 अंकांनी वधारत होता आणि सर्व मिडकॅप शेअर्स 175.90 अंकांनी किंवा 0.39 टक्क्यांनी वाढून 44905 वर व्यवहार करताना दिसत होते. मिडकॅप शेअर्सनी आतापर्यंतची सर्वोच्च पातळी गाठली आहे. निफ्टीमधील फक्त आयटी निर्देशांक घसरला आहे.

मंगळवारी सुरुवातीच्या व्यवहारात, इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट अथॉरिटी किंवा IREDA चे शेअर्स 14 टक्क्यांनी वाढले होते आणि त्यांनी 97 रुपयांची पातळी ओलांडली. हजूर मल्टी प्रोजेक्ट लिमिटेडचा शेअर पाच टक्क्यांनी, आशानिषा इंडस्ट्रीजचा शेअर 4.5 टक्के आणि बीसीएल इंडस्ट्रीजचा शेअर 3.4 टक्क्यांनी वाढला आहे.

Share Market Opening latest updates in marathi
Adani Group: गौतम अदानी आणखी एक कंपनी खरेदी करण्याच्या तयारीत, 4100 कोटींची लावली बोली

अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मंगळवारी सुरुवातीच्या व्यवहारात 9 पैकी चार लिस्टेड कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते, तर पाच कंपन्यांचे शेअर्स घसरले होते.

एसीसी, अंबुजा सिमेंट, अदानी पोर्ट्स आणि अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स वाढले तर अदानी विल्मर, अदानी पॉवर, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी टोटल गॅस आणि एनडीटीव्ही या कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह व्यवहार करत होते.

मंगळवारी सुरुवातीच्या व्यवहारात, निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक निर्देशांक वाढ नोंदवत आहेत. सुरुवातीच्या व्यापारात वाढ दर्शविलेल्या शेअर्समध्ये UPL, UltraTech Cement, Adani Enterprises आणि LTI Mindtree चे शेअर्स समाविष्ट होते, तर घसरण दर्शविणाऱ्या शेअर्समध्ये BPCL सारख्या कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश होता.

Share Market Opening latest updates in marathi
GST Notice: एलआयसीला पुन्हा GST ची नोटीस; व्याज आणि दंडासह केली 183 कोटींची मागणी, काय आहे प्रकरण?

यूएस फेडवर बाजाराचे लक्ष

अमेरिकेतील नोव्हेंबर महिन्यातील महागाईचे आकडे आज जाहीर होणार असून, दोन दिवसीय फेड बैठकही आजपासून सुरू होत आहे. विश्लेषकांचा अंदाज आहे की फेडचे अध्यक्ष जेरोम पॉवेल हे दरांमध्ये कोणतेही बदल करणार नाहीत.

दर कपातीबाबत पॉवेल यांच्या निर्णयावर बाजार लक्ष ठेवेल, कारण 2024 पासून दर कपात सुरू होईल असा अंदाज आहे. 13 डिसेंबर रोजी धोरण जाहीर केले जाईल. याशिवाय, नोव्हेंबर महिन्यासाठी भारतातील किरकोळ चलनवाढीचा आकडाही आज जाहीर केला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com