
नागपूर: ‘‘विधानसभा निवडणुका ज्या मतदार याद्यांवर झाल्या त्याच याद्यांवर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांचे काही आक्षेप असतील तर त्यांनी आत्ताच निवडणूक आयोगाकडे नोंदवावेत. पुन्हा निवडणूक हरल्यानंतर अपयशाचे खापर मतदार यादीवर फोडू नये,’’ असे आवाहन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना केले.