नागपूर : खाद्य तेल महागच; तूर, हरभरा स्वस्त

केंद्र सरकारने खाद्य तेलावरील आयातशुल्क कमी केल्यानंतर सलग दुसऱ्या आठवड्यातही खाद्य तेलाच्या दरात वाढ सुरु आहे.
Food-Oil
Food-OilSakal

नागपूर : केंद्र सरकारने खाद्य तेलावरील आयातशुल्क कमी केल्यानंतर सलग दुसऱ्या आठवड्यातही खाद्य तेलाच्या दरात वाढ सुरु आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे बजेट बिघडू लागले आहे. मात्र, हवामानात गारवा आणि उष्णता वाढल्याने डाळीच्या दरात किंचित घट झालेली आहे. असेच वातावरण राहिल्यास तूर आणि हरभरा डाळीच्या दरात घसरण होण्याचे संकेत मिळत आहेत. (Nagpur Food Oil Rate Updates)

अवेळी आलेल्या पावसामुळे यंदा देशातील तेलबियाण्यांच्या उत्पादन घट होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे भविष्यात खाद्यतेलाचे दर वाढतील, हे निश्चित आहे. परंतु याची तीव्र झळ सर्वसामान्य ग्राहकांना आतापासून बसू लागली आहे. ही झळ बसू नये म्हणून खाद्यतेलावरील आयात शुल्क केंद्र सरकारने कमी केले होते. मात्र, तेलाचे दर वाढतच असल्याने या दरवाढीमागे कोण, असा प्रश्न उभा ठाकला आहे. काही आघाडीच्या कंपन्याच तेलाचे कार्टेलिंग करीत असल्याचा आरोपही केला जात आहे. यात सर्वसामान्य ग्राहक भरडला जात आहे.

Food-Oil
Budget 2022 : ग्रामीण अर्थव्यवस्थेबाबत 'या' तीन अपेक्षा

कोरोनामुळे आधीच सर्व हैराण असताना आता सर्वसामान्यांना आणखी एक झटका बसलाय. तेलाचे दर वाढले आहेत. मात्र, डाळींचे भाव घसरले आहेत. बाजारात ग्राहकांची वर्दळ कमी असल्याने धान्य, तांदूळ, डाळीची मागणी कमी झालेली आहे. त्यामुळे तूर डाळ आणि हरभरा डाळीच्या दरात घसरण झालेली आहे. तूर डाळींच्या भावाने उच्चांक पातळी गाठल्याने सर्वसामान्यांची झोप उडाली होती. मात्र, आता डाळीची आवक वाढल्याने डाळींचे भाव पुन्हा घसरू लागले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. ग्राहकही गरजेनुसार वस्तूंची खरेदी करीत असल्याने डाळींची मागणी कमी झालेली आहे.

पावसामुळे तांदळाचे दर वाढलेले

नवीन तांदूळ बाजारात आला असून भाव वाढलेल्या स्थितीत स्थिरावलेले आहेत. होळीपर्यंत जुन्या तांदळाची मागणी वाढत असल्याने ही भाववाढ कायम राहण्याची शक्यता आहे. नवीन तांदूळ बाजारात आल्यानंतर भावात घसरण होण्याचे संकेत होते. मात्र, अवेळी आलेल्या पावसामुळे धानाचे नुकसान झाल्याने तांदळाचे भाव वाढलेल्या स्थितीत स्थिरावलेले आहे, असे नागपूर किराणा किरकोळ संघाचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com