Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींमुळे वित्तीय तूट नाही; उच्च न्यायालयामध्ये शासनाचे उत्तर, सरकार योजनेवर ठाम
Maharashtra Economy : नागपूर खंडपीठात ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे राज्य अर्थव्यवस्थेला फटका बसल्याचा आरोप करणारी जनहित याचिका दाखल झाली. राज्य शासनाने हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट केले.
नागपूर : लाडकी बहीण योजनेमुळे राज्याची अर्थव्यवस्था कोलमंडली असल्याचा आरोप करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. परंतु, राज्य शासनाने हा आरोप साफ फेटाळला आहे.