Anganwadi Sevika Strike: अंगणवाडी सेविकांकडून सरकारला बांगड्यांचा आहेर, संविधान चौकात आयटकतर्फे अनोखे आंदोलन

यावेळी माघार घेणार नाही, असा एल्गार करीत संविधान चौकात अंगणवाडीसेविकांनी आयटकच्या नेतृत्वात बांगड्यांचा अहेर सरकारला दिला.
anganwadi sevika
anganwadi sevika

Nagpur Anganwadi Sevika Strike: चाळीस दिवसांपासून अंगणवाडी सेविकांचे आंदोलन सुरू आहे. आम्हा महिला शक्तीचा अंत पाहू नये. अपुऱ्या मानधनात सरकारने उदरनिर्वाह करून दाखवावा. मंत्र्यांनी आश्वासने दिली. ठोस निर्णय घेतला नाही. म्हणून यावेळी माघार घेणार नाही, असा एल्गार करीत संविधान चौकात अंगणवाडीसेविकांनी आयटकच्या नेतृत्वात बांगड्यांचा अहेर सरकारला दिला.

४ डिसेंबर २०२३ पासून दोन लाख अंगणवाडी कर्मचारी बेमुदत संपावर आहेत. त्यांच्या आंदोलनाची दखल सरकार घेत नाही. मंत्री अदिती तटकरे यांच्याशी झालेल्या चर्चेत तोडगा निघाला नाही.

आयटकने १८ डिसेंबरला हिवाळी अधिवेशनावर महामोर्चा काढला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली. संबंधित विभागाची बैठक घेतो, असे आश्वासन दिले. तेव्हापासून अंगणवाडी सेविका आश्वासनाच्या श्वासावर आहेत. (Latest Marathi News)

२१ डिसेंबरला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या देवगिरी बंगल्यावर सेविकांनी आंदोलन केले. त्यांनीही आश्वासन दिले. मात्र समस्या सरकार सोडवीत नाही. यामुळे संप अधिक तीव्र करण्याचा निर्णय करून आयटकने मंगळवारी (ता.९) अनोखे बांगडी आंदोलन केले. धरणे आंदोलनात आयुक्तांच्या पत्राची होळी केली. आता जेलभरो आंदोलन करणार, जोपर्यंत सरकारला जाग येत नाही, तोपर्यंत अंगणवाडी कर्मचारी संविधान चौकात आंदोलन करणार असा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला. आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलेल्या भंडारा जिल्ह्यातील सेविका विमल गोंधडे यांचे अपघाती निधन झाले. त्यांना यावेळी अभिवादन करण्यात आले.

anganwadi sevika
Mantralaya Dance Video: कामाच्या वेळेत मंत्रालयात महिला कर्मचाऱ्यांचा डान्स? विरोधी पक्ष नेत्यांची टीका, व्हिडीओ व्हायरल

या आहेत मागण्या..

  • मानधनात वाढ करा

  • ग्रॅच्युइटी, निर्वाह भत्ता द्या

  • दरमहा २६ हजार रुपये द्या

  • मदतनिसांना २० हजार मानधन द्या

  • महागाई निर्देशांकानुसार मानधनात वाढ करा

  • आता करणार ‘जवाब दो’ आंदोलन

आयटकचे महासचिव श्यामजी काळे, जिल्हा सचिव ज्योती अंडरसहारे यांच्या नेतृत्वात आता जबाब दो आंदोलन करण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. या आंदोलनाला उपस्थित आशा व गटप्रवर्तक मंगला लोखंडे, मंदा डोंगरे, संगीता गौतम, मोहिनी बालपांडे, शीतल कळमकर, यांनी पाठिंबा दिला. वनिता कापसे, ज्योती अंडरसहारे, उषा चारभे,विद्या गजबे विशाखा हाडके सीमा गजभिये चंद्रप्रभा राजपूत करून साखरे,सुनीता पाटील, शालिनी मुरारकर आशा बोधलखंडे ,

जयश्री चहांदे, विशाखा पाटील, रेखा कोहाड, मंगला चामट, विजया कश्यप,वीणा खंडाते, रेखा भुसारी, लता भड ,सुंनदा भगत , बबिता खरपुरे,प्रमिला चौधरी,कुमुद नवकरीया, आशा पाटील, छाया कडू सुनीता मानकर,उषा सायरे, मंगला रंगारी, दीर्घांना कावळे, शीला लोखंडे, सुरेखा पवार, शैला काकडे, शीला पाटील यांच्यासह हजारो सेविकांनी एका सुरात आता जबाब दो आंदोलन करण्याच्या निर्धाराला पाठींबा जाहीर केला. (Latest Marathi News)

anganwadi sevika
Shivsena MLA Disqualification Case : ''निकाल वेगळा आला तर...'', पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितली पुढची रणनीती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com