Winter Session: तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्यांवर लागणार 'मकोका'! भरारी पथकं करणार धडक कारवाई, आत्राम यांची माहिती

शाळेच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थाची विक्री रोखण्यासाठी भरारी पथके, धर्मबाबा आत्राम यांची विधानपरिषदेत माहिती
Winter Session: तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्यांवर लागणार 'मकोका'! भरारी पथकं करणार धडक कारवाई, आत्राम यांची माहिती

Tobacco Substances Near School: राज्यातील शाळांच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करण्यास शासनाने मनाई आदेश लागू केला आहे. शाळांच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री रोखण्यासाठी लवकरच भरारी पथके निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी बुधवारी (ता.१३) विधान परिषदेत दिली.

राज्यातील शाळांच्या १०० मीटर परिसरात सर्रासपणे तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्री होत असल्याचा विषय लक्षवेधीच्या माध्यमातून सदस्य विक्रम कोळे यांनी विधान परिषदेत उपस्थित केला. यावर उत्तर देताना मंत्री धर्मराव बाबा आत्राम म्हणाले, राज्यात शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेच्या आवारात तंबाखूजन्य पदार्थ मिळू नये म्हणून नियम आहेत.

या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईची तरतूद आहे. मात्र अलीकडे याला कायद्याचे रुप देण्यासंदर्भात विचार करण्यात येईल. यासाठी राज्यातील संबंधित १२ विभागाच्या यंत्रणा व पालकांची एक संयुक्त बैठक घेऊन कडक कायदा करण्यासंदर्भात विचार करण्यात येणार आहे. (Latest Marathi News)

वेळप्रसंगी ‘मकोका’ लावण्यासाठी प्रयत्न केला जाईल. गुटखा, तंबाखूजन्य पदार्थांची विक्री थांबविण्यासाठी १२ विभागांना एकत्र घेऊन ५-६ लोकांचे भरारी पथक स्थापन करण्यात येत आहे. याशिवाय अन्न व औषध प्रशासन विभागाने गेल्या वर्षभरात या पदार्थाची विक्री करणाऱ्या टपऱ्याविरोधात मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे. ही कारवाई सतत सुरू आहे. शाळांमधील विद्यार्थी नकळत व्यसनाकडे ओढला जाऊ नये यासाठी विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षण संस्थांचे मुख्याध्यापक, शाळा कृती समितीचे पदाधिकारी यांना अधिक दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत.

Winter Session: तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्यांवर लागणार 'मकोका'! भरारी पथकं करणार धडक कारवाई, आत्राम यांची माहिती
West Bengal Accident News: वीटभट्टीची चिमणी कोसळून तीन मजूर ठार, 30 हून अधिक जखमी

केंद्र सरकार यासंदर्भात कायदा करीत असून, तो अंतिम टप्प्यात आहे. तो कायदा अस्तित्वात आल्यानंतर तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर नियंत्रण येणार आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागात मनुष्यबळ वाढवीत येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

सदस्य महादेव जानकर यांनी उपप्रश्नाच्या माध्यमातून सांगितले की, या प्रकारच्या गुन्ह्यामध्ये नॉन बेलेबल कायदा करणार का? त्यावर मंत्र्यांनी सांगितले की, कलम ३२८ अन्वये कायदा केला आहे, तो राष्ट्रपतींकडे मंजुरीकरिता पाठविण्यात आला आहे. तसेच गेल्या ७-८ महिन्यात राज्यात ६० कोटीचा गुटखाही जप्त केल्याची माहिती त्यांनी दिली. सदस्य सुरेश धस, शशिकांत शिंदे, सचिन अहीर, भाई जगताप, नरेंद्र दराडे, रामदास आंबटकर, अमोल मिटकरी यांनी सहभाग घेतला. (Latest Marathi News)

Winter Session: तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्यांवर लागणार 'मकोका'! भरारी पथकं करणार धडक कारवाई, आत्राम यांची माहिती
संजय राऊत..सोम्या-गोम्या, राजकीय नेत्यांवर PHD ते अमित शाहांची भेट; अजित पवारांचे विविध विषयांवर भाष्य

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com