Anil Deshmukh: फडणवीसांमध्ये जर हिंमत असेल तर....अनिल देशमुखांची टीका, 'कमंडल यात्रे'चाही केला उल्लेख

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
Anil Deshmukh: फडणवीसांमध्ये जर हिंमत असेल तर....अनिल देशमुखांची टीका, 'कमंडल यात्रे'चाही केला उल्लेख

Anil Deshmukh on Mandal Commission: ज्यांनी मंडल आयोगाला विरोध करीत कमंडल यात्रा काढली होती. नंतर मंडल आयोग लागू केला म्हणून व्ही.पी. सिंग सरकारचा पाठिंबा काढून ते सरकार पाडणारे आता शरद पवारांमुळे मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही असे सांगत आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात जर हिंमत असेल तर आरक्षणाचा प्रश्न सोडवावा. उगाच स्वत:च्या निष्क्रियतेचे खापर हे दुसऱ्यांवर फोडू नये, अशी टीका माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फडणवीस यांच्यावर केली आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणाला कोणाचाही विरोध नाही. परंतु, त्यांना आरक्षण देताना ओबीसी समाजावर अन्याय होऊ नये, अशीच भूमिका आमची आहे. जोपर्यंत लोकसभेत केंद्र शासन घटना दुरुस्ती करीत नाही व आरक्षणाचा टक्का वाढवून घेत नाही. तोपर्यत यावर तोडगा निघूच शकत नाही. (Latest Marathi News)

यासाठी राज्य सरकारला केंद्राची मदत घेण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी सरकारने सर्वपक्षीय आमदार व खासदार यांना दिल्लीमध्ये नेऊन पंतप्रधान यांच्यासोबत बैठक घ्यावी. केंद्रात स्वत:च्याच पक्षाचे सरकार असल्याने फडणवीस केंद्राची मदत घेऊन मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतात. परंतु, दुसऱ्यांकडे बोट दाखवून समाजा-समाजात वाद निर्माण करण्याचे काम ते करीत असल्याचा आरोपही देशमुख यांनी केला आहे.

Anil Deshmukh: फडणवीसांमध्ये जर हिंमत असेल तर....अनिल देशमुखांची टीका, 'कमंडल यात्रे'चाही केला उल्लेख
Maharashtra Assembly Winter Session 2023: सत्ताधारी जोमात; विरोधक बॅकफूटवर! तिसऱ्या आठवड्याचे आजपासून कामकाज विरोधक काढणार मंत्र्यांची प्रकरणे?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com