esakal | दोन सदस्यांचा प्रभाग जनतेची मागणी; आघाडीने पुनर्विचार करावा
sakal

बोलून बातमी शोधा

nana patole

दोन सदस्यांचा प्रभाग जनतेची मागणी; आघाडीने पुनर्विचार करावा

sakal_logo
By
राजेश चरपे

नागपूर : महाविकासआघाडी तीन पक्षांची असल्याने प्रत्येकाचे मत वेगवेगळे राहू शकते. मात्र, महापालिका निवडणुकीमध्ये दोन सदस्यीय प्रभाग पद्धती असावी अशी जनतेची मागणी आहे. काँग्रेस जनतेसोबत असून तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीचा सरकारने फेरविचार करावा असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले.

चार सदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे किती गैरसोयीची आहे याचा सर्वांनाच अनुभव येत आहे. छोट्या छोट्या समस्या सोडवण्यासाठी नागरिकांना चारचार नगरसेवकांकडे चकरा माराव्या लागतात. ते एकमेकांकडे बोट दाखवतात. विकासकामांमध्येही खोळंबा निर्माण होतो. त्यामुळे जनता त्रस्त झाली आहे. त्यांना चार सदस्यीय प्रभाग पद्धती नको आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांचेसुद्धा हेच म्हणणे आहे, असे नाना पटोले म्हणाले.

हेही वाचा: वीस वर्षांनंतर पहिल्याच पतीशी पुनर्विवाह; पत्नीने केला होता दुसरा विवाह

आम्ही काँग्रेसच्यावतीने तीन सदस्यीय प्रभाग पद्धती नको असल्याचे निवेदन सरकारला दिले आहे. जनता आणि कार्यकर्त्यांची भावना सरकारपर्यंत पोहोचवण्याचे काम काँग्रेस संघटनेच्या माध्यमातून केले आहे. तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीला अनेक मंत्र्यांचासुद्धा विरोध आहे. आमचे विधानमंडळाचे नेते बाळासाहेब थोरात यांनीसुद्धा कार्यकर्त्यांच्या भावनेचे समर्थन केले आहे. काँग्रेसच्या निवेदनाचा विचार केला नाही तर लोकशाही व्यवस्थेचा सन्मान करून आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ, असेही नाना पटोले यांनी सांगितले.

हेही वाचा: रात्रीच्या अंधारात बोकड चोरला, कापला अन् मालकालाच विकला

ती चर्चा चुकीची

भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी राज्यसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. एखाद्या नेत्याचा आकस्मिक मृत्यू झाल्यास त्या जागेवर निवडणूक झाल्यास बिनविरोध व्हावी असे प्रयत्न केले जातात. यासाठी सर्व पक्षांची सहमती घेतली जाते. तशी परंपरा महाराष्ट्राची आहे. या बदल्यात भाजपच्या बारा आमदारांच्या निलंबन रद्द केले जाईल ही चर्चा चुकीची असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.

loading image
go to top