esakal | महावितरणने घेतला हा मोठा निर्णय...वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

Mahavitaran take big Decision about eletricity

लॉकडाउनच्या कालावधीतील वीजबिलातील स्थिर आकार माफ करण्यात यावा, अशी मागणी अनेक औद्योगिक तसेच वाणिज्यिक ग्राहकांनी केली होती. ही मागणी ग्राह्य धरून डॉ. नितीन राऊत यांनी या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे.

महावितरणने घेतला हा मोठा निर्णय...वाचा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर घोषित लॉकडाउनमुळे राज्यातील सर्वच मोठे उद्योग आणि वाणिज्यिक ग्राहकांनी व्यवसाय बंद केलेला आहे. लॉकडाउनच्या कालावधीत बंद असलेल्या औद्योगिक आणि वाणिज्यिक ग्राहकांच्या वीजबिलातील स्थिर आकार पुढील तीन महिन्यांसाठी स्थगित करण्याची आणि त्यानंतर येणाऱ्या बिलात कोणताही दंड न आकारता तो समाविष्ट करण्याची घोषणा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज नागपूर येथे केली.


लॉकडाउनच्या कालावधीतील वीजबिलातील स्थिर आकार माफ करण्यात यावा, अशी मागणी अनेक औद्योगिक तसेच वाणिज्यिक ग्राहकांनी केली होती. ही मागणी ग्राह्य धरून डॉ. नितीन राऊत यांनी या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. एएमआरमार्फत ज्या ग्राहकांचे मीटर वाचन उपलब्ध आहे, अशांना त्यांच्या मीटरवरील नोंदीनुसार वास्तविक बिल देण्यात येईल. ग्राहकांचे मीटर रीडिंग उपलब्ध नसल्यास सरासरी वीजबिल आकारण्यात येईल. मे 2020 मध्ये एएमआरमार्फत बिलाची माहिती उपलब्ध झाल्यानंतर वास्तविक मीटर रीडिंगनुसार वीजबिल आकारण्यात येईल.

बहुऔषधी गुणधर्मामुळे या हळदीला मिळतोय अधिक भाव

लॉकडाउनच्या कालावधीत कुठल्याही प्रकारचा वीजवापर झाला नसल्याचे समजून लॉकडाउनच्या कालावधीतील शून्य वापराचे वीजबिल देण्यात येईल. मीटर रीडिंग मिळाल्यानंतर या ग्राहकांना लॉकडाउनच्या कालावधीत नोंदविलेल्या वास्तविक वापराचे वीजबिल देण्यात येईल. तसेच लोड फॅक्‍टर, पीएफसारख्या सर्व सवलती उपलब्ध असतील. मार्चच्या वीजवापराच्या बिलाची देयक तारीख 15 मे असणार आहे. तर एप्रिलच्या वीजवापराच्या बिलाची देयक तारीख 31 मे राहील. या दोन्ही महिन्यांच्या बिलावर नियमाप्रमाणे अनुदान लागू असेल.


ग्राहकांना वेबसाईट किंवा मोबाईल ऍपद्वारे सेल्फ रीडिंग घेऊन वीजबिल भरता येईल. ज्या ग्राहकांनी स्वत:हून मीटर रीडिंग सादर न करणाऱ्या ग्राहकांकडून सरासरीनुसार वीजआकारणी केली जाणार आहे. ग्राहकांनी आपले वीजबिल वेळेवर भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहनही ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले.

loading image
go to top