esakal | दोन डोस न घेतलेल्या ग्राहकांमुळे मॉल होणार ‘सील’ !
sakal

बोलून बातमी शोधा

Shopping-Mall

नागपूर : दोन डोस न घेतलेल्या ग्राहकांमुळे मॉल होणार ‘सील’ !

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : शहरातील धार्मिक स्थळे व मॉल दोन डोस घेतलेल्यांनाच प्रवेश देण्याच्या अटीवर सुरू करण्यात आले. दोन डोस न घेतलेल्या मॉल व धार्मिक स्थळी दोन डोस न घेतलेले नागरिक आढळून आल्यास संबंधित व्यवस्थापनावर कारवाईचे निर्देश आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी आज दिले. महापालिकेने धार्मिक स्थळे व मॉलची तपासणी सुरू केली आहे.

शुक्रवारपासून शहरामध्ये ''मिशन कवच कुंडल'' मोहिम राबविण्यात येत आहे. ही १४ ऑक्टोबरपर्यंत असून आज मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या अध्यक्षतेत मनपा मुख्यालयातील कोरोना वॉर रूममध्ये टास्क फोर्स समितीची बैठक पार पडली.

हेही वाचा: Lakhimpur : केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रांच्या मुलाला अटक

बैठकीत अतिरिक्त आयुक्त राम जोशी, डब्ल्यूएचओ चे प्रतिनिधी राजिद खान, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर, डॉ. गोवर्धन नवखरे यांच्यासह सर्व झोनचे सहायक आयुक्त, सर्व झोनल आरोग्य अधिकारी, शहरातील स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. आतापर्यंत शहरातील ७४ टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतला. ३७ टक्के नागरिकांनी दोन्ही डोस पूर्ण केले आहे.

मात्र शहरातील सुमारे ५ लाख पात्र व्यक्तींनी अजूनपर्यंत लसीकरणाचा पहिला डोसही घेतला नाही. ''मिशन कवच कुंडल'' अंतर्गत लसीकरण न झालेल्या व्यक्तींचे लसीकरण करण्याचे कार्य मनपातर्फे करण्यात येणार आहे. यासाठी सर्व प्रभागांमध्ये सर्वेक्षण करून लसीकरण न झालेल्यांचे लसीकरण पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

१५५ केंद्रांवर लसीकरणाची व्‍यवस्था

कोविड संसर्गाचा धोका टाळण्यासाठी लसीकरण आवश्यक आहे. लसीकरणासाठी शहरातील १५५ केंद्रांवर मनपाद्वारे व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे. नियमांच्या अधिन राहून नागपूर शहरातील मॉल, धार्मिक स्थळे सुरू करण्यात आले आहेत. या ठिकाणांहून कोरोनाचा संसर्ग होऊ नये यादृष्टीने संबंधित व्यवस्थापनाने काळजी घेणे आवश्यक आहे. येत्या १५ ऑक्टोबरला दीक्षा भूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम होणार असून येथेही लसीकरणाचे दोन डोस पूर्ण करणाऱ्यांनाच प्रवेश देण्यात येणार आहे.

"शहरातील सुमारे ५ लाख पात्र व्यक्तींनी अजूनपर्यंत लसीकरणाचा पहिला डोसही घेतला नाही. कोविड संसर्गाचा धोका टाळण्यासाठी लसीकरण आवश्यक आहे. नियमांच्या अधिन राहून नागपूर शहरातील मॉल, धार्मिक स्थळे सुरू करण्यात आले आहेत. या ठिकाणांहून कोरोनाचा संसर्ग होऊ नये याकरिता संबंधित व्यवस्थापनाने काळजी घेणे आवश्यक आहे."

- राधाकृष्णन बी., आयुक्त, महापालिका.

loading image
go to top