esakal | धावत्या रेल्वेत अस्वस्थ वाटू लागले, पण स्टेशन येताच झाला मृत्यू

बोलून बातमी शोधा

died

धावत्या रेल्वेत अस्वस्थ वाटू लागले, पण स्टेशन येताच झाला मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : धावत्या रेल्वेत अचानक प्रकृती खालावून वृद्ध प्रवाशाचा मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी संपर्कक्रांती एक्स्प्रेसमध्ये (sampark kranti express) ही घटना घडली. प्रकृती खालावल्याची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाकडून (railway) तातडीने वैद्यकीय मदत (medical help) उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली. पण, ट्रेन नागपूर स्टेशनवर (nagpur railway station) येईपर्यंत बराच उशीर झाला होता. (man died in running sampark kranti express in nagpur)

हेही वाचा: सायबर गुन्हेगाराच्या घशातून पैसे आणले परत; नागपूर सायबर पोलिसांची कामगिरी

सुखदेव सिंग (७५) असे मृताचे नाव असून ते पंजाबच्या पटियाला येथील रहिवासी होते. ०६२४९ यशवंतपूर - हजरत निजामुद्दीन संपर्कक्रांती एक्स्प्रेसच्या एस-११ डब्यातील ११ क्रमांकाच्या बर्थवरून त्यांचा प्रवास सुरू होता. त्यांचा मुलगा शैलेंद्रही सोबत होता. प्रवासादरम्यान सुखदेव यांना अस्वस्थ वाटू लागले. मुलाने त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करीत शांत झोपून राहण्याचा सल्ला दिला. सोबतच रेल्वेतील टीटीला माहिती दिली. तोवर ट्रेन नागपूरजवळ पोहोचली होती. यामुळे कंट्रोलरूमला कळविण्यात आले. स्टेशन उपस्टेशन व्यवस्थापक कार्यालयाकडून तातडीने रेल्वेच्या डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. गाडी नागपूर स्टेशनचा फलाट क्रमांक १ वर येऊन थांबताच रेल्वेच्या डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. तातडीने लोहमार्ग पोलिसांना सूचना देण्यात आली. त्यांनी पंचनामा करीत मृतदेह मेयो रुग्णालयात पाठवून दिला.