esakal | वडिलांच्या वर्षश्राद्धाच्या खर्चातून कोरोना बाधितांसाठी व्हेंटिलेटर; नागपुरातील अजित पारसे यांचं कौतुकास्पद पाऊल

बोलून बातमी शोधा

null

वडिलांच्या वर्षश्राद्धाच्या खर्चातून कोरोना बाधितांसाठी व्हेंटिलेटर; नागपुरातील अजित पारसे यांचं कौतुकास्पद पाऊल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोनांमुळे स्थिती हाताबाहेर गेली असून बधितांसाठी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर कमी पडत आहे. कोरोनाविरुद्धचा लढ्यात तसेच एकाचा तरी जीव वाचावा, यासाठी सोशल मिडिया विश्लेषक अजित पारसे यांनी वडिलांचे वर्षश्राद्धावरील खर्च टाळून त्या पैशात व्हेंटिलेटर खरेदी केले. ते केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या सुपूर्द करीत बाधितांना समर्पित केले.

हेही वाचा: मांगुर्ला जंगलात वाघिणीची हत्या; यवतमाळ जिल्ह्यातील मुकुटबन वनपरिक्षेत्रातील घटना

जिल्ह्यात दररोज सात हजारपेक्षा जास्त कोरोनाबाधित वाढत आहे. त्यामुळे रुग्णालयात बेड, वेंटिलेटर, ऑक्सिजन या जीवरक्षक बाबीचा तुटवडा पडला आहे. वेळेवर ॲाक्सीजन न मिळाल्याने अनेकांचे जीव जात आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ७५ हजारांवर गेली आहे. सक्रिय रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अपुरी पडली आहे. ऑक्सिजन आणि व्हेटिंलेरशिवाय बधितांच्या मृत्यूने व्यथित झालेल्या अजित पारसे यांनी वडील बाळासाहेब पारसे यांच्या वर्षश्राद्ध रद्द केले. वर्षश्राद्धावर होणाऱ्या खर्चाची जी बचत झाली, त्यात आणखी काही पैसे जोडून त्यांनी कोरोना रुग्णांसाठी ‘ॲाक्सीजन ह्युमिडीफायर - व्हेंटिलेटिंग युनिट‘ अर्थात मिनी व्हेंटिलेटर खरेदी केले.

व्हेटिलेटरवर जाण्यापूर्वी ॲाक्सीजन लेव्हल कमी होत असलेल्या कोरोना रुग्णांसाठी हे यंत्र फायद्याचे आहे. सध्या व्हेटिलेटर बेड उपलब्ध नसल्याने या यंत्राची कोरोना रुग्णांना मोठी मदत होणार आहे. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी त्यांच्याकडे हे व्हेंटिलेटर सुपूर्द करून अजित पारसे यांनी कोरोनाबाधितांसाठी समर्पित केले. पारसे यांचा इतरांनीही आदर्श घेतला आरोग्य यंत्रणेला आधार मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: नशा करण्यासाठी पितात सॅनिटायझर; मद्यपींचा अजब पर्याय जीवघेणा; वणीतील घटनेने पोलखोल

संपादन - अथर्व महांकाळ