Success Story: आता क्यूमॅथच्या सहाय्यानं हसत खेळत सोडवा गणिताचे प्रश्न; नागपूरच्या तरुणाची संकल्पना  

man in Nagpur started teaching maths by Qmaths
man in Nagpur started teaching maths by Qmaths

नागपूर ः गणित विषय नेहमीच सोडवायला कठीण... प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात गणित म्हणजे खलनायक ! त्यामुळे हा विषय सर्वांचाच नावडता. मात्र दुसऱ्या बाजूला, गणितीय संकल्पना लहान वयात खेळता खेळता शिकवणं फार महत्त्वाचं असतं. त्यामुळे कमी वयातच या विषयाबद्दल उत्सुकता निर्माण होते आणि शिक्षणाचा भक्कम पाया करण्यासाठी मनन खुरमा यांनी क्यूमॅथ हि संकल्पना विकसीत केली.

गणिताबद्दल सर्वसाधारणपणे असलेला गैरसमज दूर करण्यासाठी २०१३ मध्ये मनन खुरमा यांनी ‘क्यूमॅथ़' सुरु केले. लहान मुलांसाठी गणिताचे शिक्षण नव्या स्वरुपात देणे या उद्देशाने आणि गणित एक जीवनकौशल्य म्हणून शिकायला हवं. फक्त एक शालेय विषय म्हणून नाही या ठाम धारणेतून त्यांनी हा उपक्रम सुरू केला.

मॅथ, कोडिंग, डेटा आणि एआय अशी कौशल्ये मुलांना शिकवणं आणि त्यांना पुढच्या पिढीतील प्रॉब्लेम सॉल्व्हर बनवणं हे त्यांचे ध्येय आहे. सर्व समस्या सोडवण्याचे मूळ मॅथमध्ये आहे आणि मॅथ हा विषय रीझनिंगसोबत शिकला गेला नाही तर त्याची मोठी किंमत चुकवावी लागते. गणित हा सामान्य विषय नाही. गणित म्हणजे तर्कशास्त्र, मेंटल मॉडेल्स तयार करणे, अल्गोरिदमिक विचार करणे आणि रीझनिंग. म्हणूनच गणित हा फक्त विषय नाही तर एक जीवनकौशल्य आहे. त्या पद्धतीनेच तो शिकवला जायला हवा. गणिताचे हे मूलभूत स्वरूप पाहता मुलामध्ये गणिताबद्दलचे अंतर्ज्ञान निर्माण व्हायला हवे. अंतर्ज्ञान म्हणजे फक्त संकल्पना माहीत असणे नव्हते, तर खऱ्या जगातील कोणत्याही संदर्भात सहजपणे त्या वापरता येते असे मनन यांचे म्हणणे आहे.

अंतर्ज्ञान म्हणजे शाळेत चांगले मार्क काढण्यासाठी गणितातील घातांक समजून घेणे नसते. तर या घातांकांची वाढ, त्यांचे नाट्यपूर्ण स्वरूप समजून घेणे आणि कोविड-१९ ची समस्या सोडवण्याची गुरुकिल्लीही या घातांक वाढीला समजून घेण्यात आहे. या गरजा लक्षात घेऊन क्यूमॅथचा कार्यक्रम अत्यंत काळजीपूर्वक रचण्यात आला आहे. तुमच्यासाठी योग्य शिक्षण शोधणे आणि वर्गातील संख्या सुयोग्य ठेवण्यापासून ते प्रत्येक विद्यार्थ्याकडे शिक्षक वैयक्तिक लक्ष देऊ शकतील अशा पद्धतीने अभ्यासक्रम तयार करणे होय.

या लाईव्ह सेशन्समध्ये सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या शंका, प्रश्न प्रत्यक्ष वेळेत सोडवणे शक्य होते. अमेरिका, मध्य पूर्व आणि सिंगापूर अशा आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये पोहोचण्याच्या योजना या कंपनीने आखल्या आहेत. गणित शिकणे आणि 'मला गणित आवडत नाही' पासून 'गणित सर्वोत्कृष्ट आहे' पर्यंतचा प्रवास सुकर करणे यातला मूळ तर्क समजून घेण्याचे महत्त्व पालकांना समजावून सांगण्यात साह्य होणार आहे.

सध्याची परिस्थिती पाहता ऑनलाइन शिक्षण अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणावरील भर वाढतच जाणार आहे. त्याचप्रमाणे भारतातील एड-टेक उद्योगाचे भविष्यही आश्वासक वाटत आहे आणि २०२५ पर्यंत ही बाजारपेठ सध्याच्या २.८ अब्ज डॉलर्सवरून १०.४ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचेल, असा अंदाज आहे. अर्थातच तंत्रज्ञानाचा वापर किती वाढतो आणि त्याचा किती लाभ घेतला जातो, यावर हे अवलंबून आहे. सध्या सर्वसामान्यांपर्यंत शिक्षण पोहोचवणे हे महत्त्वाचे आव्हान आहे. तंत्रज्ञानातील शाश्वत गुंतवणूक, दर्जेदार शिक्षक, रीअल-टाईम एंगेजमेंट आणि विश्वासार्ह मूल्यनिर्धारण ही काळाची गरज असल्याचे मनन यांचे म्हणणे आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com